लेखनात सातत्य राखल्यास उत्तम साहित्यिक होता येतं.
-रायगडभूषण प्रा एल बी पाटील शिमगचा सोन्ग “चं प्रकाशन
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )कवी आणि लेखकांना सातत्याने लेखन करणे आवश्यक आहे.ते केल्यास मोठ्या प्रयत्नाने साहित्यिक होता येते, असे विचार लेखक मच्छिंद्र
म्हात्रे यांच्या ” शिमगचा सोन्ग ” या आगरी बोलतील कथा संघर्षाच्या प्रकाशन प्रसंगी वशेणी उरण येथे अध्यक्षीय भाषणात रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील यांनी काढले.पुस्तकांचे प्रकाशन पंचायत समिती सदस्य समिधा म्हात्रे यांच्या शुभहस्ते झाले.प्रास्ताविक मच्छिंद्र म्हात्रे आणि सूत्रसंचालन किशोर म्हात्रे यांनी केले.
यावेळी भाषणात नाटककार रायगडभूषण किशोर पाटील म्हणाले की,अतिशय मेहनत करणारे,अनेक मित्र जोडणारे आणि विविध उपक्रम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मच्छिंद्र म्हात्रे. याचवेळी त्यांच्या “तंबाखू विरोध”आणि ” विद्यार्थ्यांत कवींची
शाळा ” या उपक्रमाबद्दल दिनेश म्हात्रे यांनी माहिती दिली.आगरी बरोबरीच्या प्रकारावरून इतर वक्त्यांनीही भाषणे केली.
वंदना म्हात्रे, रमेश थवई,मनोज म्हात्रे, संजय सोलकर,संगीता म्हात्रे, लवेश म्हात्रे, महेंद्र गावंड,गणेश खोत,गणपत ठाकुर, इ.ची विशेष उपस्थिती होती.संदिप गावंड यांनी उपस्थितांचे आभार मानले.