दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम
प्रतिसाद.उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )
शाम म्हात्रे सामजिक विकास मंडळ, कोकण श्रमिक संघ ,एकता कॅटलिस्ट,
आगरी शिक्षण संस्था,
बी.एम.टी.सी. कर्मचारी पुनर्वसन समिती,गणेश मन्दिर ट्रस्ट , पनवेल, सावळा ग्रामपंचायत,आर्क फाऊंडेशन ,चाणजे जमीन बचाव संघर्ष समिती,करंजा विकास मंच
यांच्या संयुक्त विद्यमाने एम. जी. एम हॉस्पिटल कामोठे आणि मसिना हॉस्पिटल, भायखळा,मुंबई यांच्या माध्यमातुन दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या तृतीय पुण्यतिथिच्या निमित्ताने सामजिक भावनेतून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाले.
दिनांक 9/6/2021 रोजी वेळ सकाळी 10 ते दुपारी 3:30 दरम्यान आगरी शिक्षण संस्था, प्लॉट 12 अ आणि ब सेक्टर-6, खांदा काॅलनी, पनवेल. तसेच
प्राथमिक शाळा सावळा गाव, ता.पनवेल, पोस्ट रसायनी.आणि समाज प्रबोधन शाळा,
आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके सभागृह, मुळेखंड, तेलिपाड्या समोर, उरण पनवेल रोड, ओएनजीसी कॉलनी जवळ, उरण या तिन्ही ठिकाणी एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तिन्ही ठिकाण मिळून या सामाजिक उपक्रमातून एकूण 103 हुन अधिक रक्त जमा झाले.
शाम म्हात्रे सामजिक विकास मंडळ, कोकण श्रमिक संघ ,एकता कॅटलिस्ट,
आगरी शिक्षण संस्था,
बी.एम.टी.सी. कर्मचारी पुनर्वसन समिती,गणेश मन्दिर ट्रस्ट , पनवेल, सावळा ग्रामपंचायत,आर्क फाऊंडेशन ,चाणजे जमीन बचाव संघर्ष समिती,करंजा विकास मंच
यांच्या संयुक्त विद्यमाने एम. जी. एम हॉस्पिटल,कामोठे आणि मसिना हॉस्पिटल, भायखळा,मुंबई यांच्या माध्यमातुन दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या तृतीय पुण्यतिथिच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे माहिती दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांची कन्या श्रुती म्हात्रे यांनी दिली.स्वर्गीय श्याम म्हात्रे यांनी आयुष्यभर शेवटच्या क्षणा पर्यंत कामगार, प्रकल्पग्रस्त तसेच गोरगरिबांसाठी लढा दिला.त्यांचे प्रश्न सोडविले त्यामुळे त्यांचे कार्य व विचार येथील जनतेच्या नेहमी स्मरणात राहील असेही श्रुती म्हात्रे यांनी आपले मत यावेळी मांडले. रक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल श्रुती म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.