70 हजार रिक्षाचालकांचा खात्यात अनुदान जमा रिक्षाचालकांसाठी एकूण 108 कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज जाहीर
माणगांव /रायगड{सचिन पवार}
मुंबई: निर्बंध काळात परवानाधारक रिक्षाचालकांचे बुडालेले उत्पन्न काही प्रमाणात भरून काढण्यासाठी त्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा करण्याच्या निर्णयानुसार आजपर्यंत एकूण दोन लाख 65 हजार 465 रिक्षा परवाना धारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत तर सुमारे 71 हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली रिक्षाचालकांसाठी एकूण 108 कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते त्यानुसार राज्यातील सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी पंधराशे रुपया प्रमाणे सानुग्रह अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला यासाठी परिवहन विभागामार्फत एक ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आले असून 22 मे 2021 पासून चालताना अर्ज करण्यासाठी ती खुली करण्यात आली आहे आजपर्यंत एकूण दोन लाख 65 हजार 465 रिक्षाचालकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत त्यापैकी 71 हजार 40 रिक्षाचालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे त्याच प्रमाणे 1 लाख 5 हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्याबाबत कळविण्यात आल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले ऑनलाईन पद्धतीचे अर्ज भरण्याकरिता परवानाधारक रिक्षा चालकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक असून तो जा बँक खात्याची जोडणी केलेला आहे त्या खात्यामध्ये रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत आहे परवानाधारकांना नवीन आधार क्रमांक काढण्याकरिता व मोगल क्रमांकाचे आधार क्रमांकाशी जोडणी करता परिवहन कार्यालय मध्ये सुद्धा आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे,