पनवेलमध्ये ही निलेश लंके प्रतिष्ठानची जीवनावश्यक मदत प्रतिष्ठानचा तरुण तुर्कांनी घेतला सामाजिक पुढाकार गोर गरिबांना कोरडा शिधा किट वाटप आ.निलेश लंके यांच्या कडून प्रेरणा घेऊन राबवला उपक्रम
पनवेल /प्रतिनिधी:- पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांचा कोरोना काळातील कामाचा डंका सातासमुद्रापार पोहोचला आहे. आमदार असावा तर लंके यांचा सारखा अशा प्रकारची सामूहिक प्रतिक्रिया सध्या महाराष्ट्रात उमटत आहे. केवळ त्याच भागात नाही तर पनवेल परिसरातही निलेश लंके प्रतिष्ठान चे सातत्याने सामाजिक पाऊल पडत आहे. प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी कामोठे आणि कळंबोली परिसरात कोरडा शिधा असलेली कीट देऊन गोर गरीब गरजूंना खऱ्या अर्थाने जीवनावश्यक मदत करण्यात आली . संघटनेच्या तरूण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना वैश्विक संकटाचे संपूर्ण जगावर सावट आहे. त्याला भारत आणि महाराष्ट्र राज्य अपवाद नाही. अनेकांना या आजाराची बाधा झाली. काहींना त्यामध्ये जीव सुद्धा गमवावा लागला. या अडचणीच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी कसा असावा याचा प्रत्यय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केवळ राज्यालाच नाही तर संपूर्ण देशाला दिला आहे. सलग दुसऱ्यांदा शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने सर्वसामान्य रुग्णांसाठी कोविड सेंटर त्यांनी सुरू केले. लोकसहभागातील या आरोग्य केंद्रामध्ये हजारो रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यांना या ठिकाणी मोफत उपचार आणि इतर सुविधा दिल्या गेल्या. आम्हालाही निलेश लंके यांचा सारखा आमदार हवा अशा प्रतिक्रिया इतर मतदारसंघातुनही येत आहेत. त्यांच्या कामाची महती राष्ट्रीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली आहे. अर्थात या कामी निलेश लंके प्रतिष्ठानने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मूळ पारनेर नगर चे अनेक जण नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत त्याचबरोबर नवी मुंबई आणि पनवेल मध्ये स्थायिक झाले आहेत. मुंबईस्थित पारनेकरांवर आमदार निलेश लंके यांचा प्रभाव आहे. पारनेर नगर प्रमाणेच मुंबईत सुद्धा निलेश लंके प्रतिष्ठान अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहे. प्रतिष्ठानच्या मुंबई शाखेचे कामोठे येथे मुख्यालय आहे. या ठिकाणच्या तरुण कार्यकर्त्यांचे आमदार निलेश लंके हे रोल मॉडेल आहेत. ते करत असलेल्या सामाजिक कामाचा आदर्श घेऊन येथील तरुणांनी पुढाकार घेऊन गोरगरीब गरजूंना मदतीचा हात देण्याचा संकल्प केला. त्यानुसार तांदूळ, तूर डाळ ,साखर, गहू,मसाले आणि इतर वस्तूंची किट तयार करून ते गरिबांना देण्यात आले. रविवारी या जीवनावश्यक मदतीचे वाटप कामोठे तसेच कळंबोली याठिकाणी करण्यात आले. प्रतिष्ठानचे मुंबई कार्याध्यक्ष गोरखनाथ आहेर आणि संपर्क प्रमुख भाऊ पावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे मुंबई युवा नेते
समर नवले , दिलीप घुले, निलेश आहेर, सचिन वाफरे ,दत्ता वाबळे ,महेंद्र पाटील
तुषार पवार ,मंगेश शिंदे ,ऋषिकेश पोटे ,सुजल नवले
तेजस पोटे ,अंकुश झंजाड ,वैभव शेळके ,प्रदीप म्हस्के,अमोल बोडखे उपस्थित होते.
चौकट
तुमचा आमदार खरच देव माणूस!
आमदार निलेश लंके यांच्या कार्याची कीर्ती सर्वदूर पोहोचली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या तोंडामध्ये आ.लंके यांचे नाव आहे. सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या या लोकप्रतिनिधीचा आदर्श घेऊन मुंबई प्रतिष्ठान च्या तरुण कार्यकर्त्यांनी कामोठे कळंबोली येथे जीवनावश्यक वस्तूंची मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. गोर गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत असताना तुमचा आमदार खरच देव माणूस आहे अशा प्रकारच्या उस्फूर्त प्रतिक्रिया त्या ठिकाणी अनेकांनी नोंदवल्या. हे शब्द कानावर पडल्यानंतर निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने समाधान उठून दिसत होते.
कोट
आमदार निलेश लंके हे आमचे आदर्श आहेत. त्यांच्या विचारांवर आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून आम्ही सर्व तरूण काम करत आहोत. आमच्या लोक नेतृत्वाच्या कार्याची दखल सातासमुद्रापार घेतली गेली आहे. त्यांच्या शिकवणीतून आम्ही सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच भावनेतून कामोठे कळंबोली परिसरातील गोर गरीब गरजूंना करोना वैश्विक संकटात मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही निलेश लंके प्रतिष्ठान च्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम नक्कीच सुरू राहील
समर नवले
युवा कार्यकर्ते
निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई