चाईड केअर संस्थेची कार्यकारिणी जाहीर.जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन. स्पर्धकांनी सहभागी होण्याचे संस्थेतर्फे आवाहन.
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील नावाजलेली संस्था चाईल्ड केअर सामाजीक संस्था, उरण रायगड ज्या संस्थेने अनेक वर्ष लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, आदिवासी वाडी मध्ये कपडे, अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू, मतिमंद मुलांना बुद्धीला चालना मिळेल अशा वस्तू वाटप केल्या. या शिवाय शैक्षणिक, सामाजिक ,पत्रकारिता , क्रीडा श्रेत्रात प्राविण्य मिळवलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार हि केला .तसेच कोविड काळात ज्यांची सेवा खूप मोलाची होती.अशा या चाईल्ड केअर सामाजिक संस्थेची वार्षिक निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर निवडणूक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- विकास कडू यांच्या अध्यक्ष खाली सल्लागार अविनाश घरत, सल्लागार दिलीप तांडेल यांच्या मागर्दर्शना खाली संपन्न झाली. संस्थे मध्ये दरवर्षी सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां मान्यवरांची सभासद म्हणून निवड होते.आणि त्यातून एक हंगामी वर्षांचे अध्यक्ष निवडतात आणि यावर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे पागोटे गावचे युवा नेते कुणाल पाटील यांची अध्यक्ष म्हणून एक मताने निवड झाली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड करण्यात आली असून 2021/2022 साठी ही निवड करण्यात आली आहे.यात अध्यक्ष -कुणाल पाटील (पागोटे ),
कार्याध्यक्ष -विक्रांत कडू (सोनारी ),
कार्याध्यक्ष -ह्रितिक पाटील (नागाव ),
उपाध्यक्ष -मनोज ठाकूर (जसखार ),
उपाध्यक्ष -तृषार ठाकूर (भेंडखळ ),
उपाध्यक्ष -केतन घरत (सावरखार ),
मुख्य सचिव -आभिषेक माळी (बालई),
सहसचिव -उद्धव कोळी (मोरा, उरण),
सहसचिव -स्वप्नील घरत (सावरखार),
खजिनदार -हर्षद शिंदे (कोटनाका ),
सहखजिनदार -आदित्य पारवे (उरण ), सदस्य -समीर घरत, रोशन धुमाळ, तेजस ठाकूर, मनीष तांडेल, विपुल कडू,आमोल डेरे, मीडिया सल्लागार – विठ्ठल ममताबादे आदींची निवड करण्यात आली आहे.
वर्षभरात संस्थेकडून विविध उपक्रम राबविले जातात यावेळी जिल्हा स्तरीय लेखन स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत.
रायगड जिल्हा मर्यादित लेखन स्पर्धा 2021.
लेखन स्पर्धेचे विषय कोविड योद्धा
1) डॉक्टर 2)पोलीस 3)सफाई कामगार 4)रक्त दाता 5)समाजसेवक
या पैकी कोणताही एका विषयावर निबंध लेखन करायचे आहे. स्पर्धेचा कालावधी 1जून ते 15 जून असे आहे.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी काही नियम व अटी असून त्याचे पालन करने स्पर्धकांना बंधनकारक आहे. अटी व नियम खालीलप्रमाणे.
1) लेखन स्पर्धा हि स्वच्छ अक्षरात असावे.खाडाखोड नसावी.
2) लेखन फक्त 2 पानात असावी.
3)लेखन प्रत (फोटो ) हा PDF फाईल ने पाठवावा.
4)लेखन प्रत हे प्रतिनिधीकडे जमा करावी.
5)लेखन मध्ये कोणाचीही नक्कल(कॉपी ) करू नये.लेखन स्वतः चे हवे.
6)लेखकाला वयाची अट नाही.
7)लेखकाजवळ (स्पर्धकां जवळ )रायगड जिल्हा मधील खालील 2 पुरावे हवेत ( रेशनींगकार्ड, मतदान ओळख पत्र, किंवा शाळेचा ओळख पत्र )
8)वर दिलेल्या विषया व्यतिरिक्त कुठलेही लेखन करायचे नाही
सदर स्पर्धेत प्रवेश फी 50 रुपये असून ते 9594690007 या नंबर वर फोन पे करावे.
विजयी उमेदवारांसाठी बक्षीस ठेवण्यात आले असून
प्रथम क्रमांक -भेट वस्तू , रू 1555
ट्राफी व प्रमाणपत्र,
द्वितीय क्रमांक-भेट वस्तू व रू 1111 तसेच ट्राफी व प्रमाण पत्र,
तृतीय क्रमांक -भेट वस्तू,व रू 555 तसेच ट्राफी व प्रमाण पत्र तर 5 उतेजनार्थ बक्षिस प्रमाण पत्र देण्यात येणार आहेत.विकास कडू व्हाट्सअप नंबर 9595690007 नंबर वर लेखन फोटो पाठवावे.असे आवाहन
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी केले आहे.