श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीच्या माध्यमातून पोलीस बांधवाना मास्क व सॅनिटायझरचे वाटप.
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची रात्रंदिवस काळजी घेणारे कोरोना योद्धा असलेले पोलीस बांधवाप्रती श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था नेहमी आदर व प्रेम बाळगत आली आहे.समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था ही पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी मदत करत आली आहे. पोलीस प्रशासनाच्या विविध उपक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था नेहमी सहभागी होत आली आहे. संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे समस्या, दुःख जवळून अनुभवले आहे. कोरोना सारख्या रोगापासून पोलीस बांधवांचे संरक्षण व्हावे त्यांचे जीवन सुखी, आनंदी राहावे या दृष्टीकोणातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीच्या माध्यमातून उरण पोलीस ठाणेतील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी पोलीस बांधवाना दिली. संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पोलीस अधिकारी व्ही एस पवार मॅडम यांनी संस्थेचे आभार मानले.
कोरोना काळात कोरोना रोगाने मृत्युमुखी पडलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वंदन करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एस पवार मॅडम,उरण पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,संस्थेचे सल्लागार -ऍड गुरुनाथ भगत,कुमार ठाकूर, ओमकार म्हात्रे, नितेश पवार, प्रकाश ठाकूर, राज पवार, भेंडखळचे सामाजिक कार्यकर्ते अनिल ठाकूर आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.