तळोजा पोलिस करणार जप्त ट्रॉल्यांचा लिलाव
पनवेल दि.19 (संजय कदम) ः चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या 4 ट्रॉल्यांची ओळखपत्रे मूळ मालकाने तळोजा पोलिस ठाण्यात आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने सदर ट्रॉल्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. परंतु 24 तारखेला होणारी लिलाव प्रक्रिया बंदोबस्तामुळे स्थगित करण्यात आली असून सदर लिलाव प्रक्रिया ही दि.29/06/2021 रोजी होणार आहे.
तळोजा पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात एकूण चार ट्रॉल्या जप्त करण्यात आलेल्या होत्या. सदर ट्रॉल्यांचे मूळ मालकांचा शोध घेतला असता परंतु ते मिळून येत नाही. सदरच्या ट्रॉल्या तळोजा पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. त्यांचे मूळ मालक मिळून येत नसल्याने प्रत्यक्ष लिलाव प्रक्रीया केली जाणार आहे. दि.29.06.2021 रोजी हि लिलाव प्रक्रिया होणार असून त्यासाठी इच्छूकांनी तत्पूर्वी तळोजा पोलिस ठाण्याचा दुरध्वनी क्र.-02227412333 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय नाळे यांनी केली आहे.