नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची शेतकरी प्रबोधिनी संघटनेची मागणी.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )
शेतकरी प्रबोधिनी संघटना
(आगरी कोळी कराडी आदिवासी समाज)
अध्यक्ष राजाराम पाटील व उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य-रामदास पाटील यांनी नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील असे नाव द्यावे अशी मागणी केली आहे.
शेतकरी प्रबोधिनी संघटना ही गोर गरीब, शेतकरी, कामगार, बहुजन वर्गांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून संघटनेने अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. आगरी कोळी कराडी, आदिवासी समाजाचे प्रभावी, उत्तम नेतृत्व म्हणून प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील साहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे असे संघटनेची आग्रही भूमिका असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रामदास पाटील यांनी फेसबुकच्या लाईव्ह माध्यमातून दिली.रामदास पाटील यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या विषयांना हात घातला. विरोधकांचाही त्यांनी खरपूस समाचार फेसबुकच्या माध्यमातून घेतला.काहीही होऊ दे आम्ही नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे नाव दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी आक्रमक भूमिका रामदास पाटील यांनी घेतली आहे.