नवी मुंबईतील अबोली महिला रिक्षाचालकांचा राजे प्रतिष्ठान वाहतूक सेनेमध्ये प्रवेश. वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर.
पनवेल / प्रतिनिधी : नवी मुंबई येथील अबोली महिला रिक्षाचालक यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका यांच्या नेतृत्वात राजे प्रतिष्ठान वाहतूक सेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी राजे प्रतिष्ठान वाहतूक सेनेच्या नवी मुंबई महिला पदाधिकाऱ्यांची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या हस्ते प्रवेश केलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना पदांचे वाटप करण्यात आले.
या कार्यकारिणीत वाहतूक सेनेच्या नवी मुंबई अध्यक्षपदी सौ.वनिता दिनेश कुचेकर, उपाध्यक्षापदी सौ.पारू पाटील, सौ. दिशा वाघमारे, सचिवपदी सौ.पूजा कदरे व सदस्य म्हणून सौ.नलिनी पोळ, सौ.मिनाली दसवते, सौ.रबना मुल्ला, सौ.सोनी वावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच उर्वरीत कार्यकारिणी लवकरच वरिष्ठांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी दिली तसेच नवी मुंबईत महिलांसाठी विशेष बस थांबा, सीएनजी पंपात गॅस भरण्यासाठी महिलांना प्राधान्य तसेच शासनाकडून अबोली महिला रिक्षाचालक यांना मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधास व महिला रिक्षाचालकांना येणाऱ्या अनेक समस्यांबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाराष्ट्र महिला अध्यक्षा अर्चना पार्टे, नवी मुंबई महिला अध्यक्षा अर्चना झेंडे, नवी मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, ओमकार महाडिक व कैलास रक्ताटे आदी उपस्थित होते.