सुकापूर येथील इसम बेपत्ता
पनवेल दि.23 (वार्ताहर): राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे. निलेश सोमवार शेळके (वय-26, रा.-सूकापूर) असे नाव असून रंग निमगोरा, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा उभट, दाढी फ्रेंच कट, नाक बसके जाड, शरिर मध्यम, केस लांब, डोळे काळे, दोन्ही हातांवर गोंदलेले, डाव्या हातावर भाजलेली खूण असून अंगात पिवळ्या फूल बाह्यांचा टिशर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅंट पायात काळी व लाल रंगाची पट्टा असलेली स्लिपर, सोबत सफेद शर्ट आहे. मोबाईल फोन आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खांदेश्वर पोलिस ठाणे 022-27465338 किंवा पोहवा ए.एच. लाळगे भ्रमणध्वनी- 9892727747 येथे संपर्क साधावा.