रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे.माझे अंगण माझी शाळा- उपक्रम.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी एकमेव शाळा म्हणजे सारडे जिल्हा परिषद शाळा ! उरण तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा व रायगड जिल्ह्यातील पहिले शैक्षणिक संग्रहालय निर्माण करण्याचा मान मिळविला आहे, त्याच प्रमाणे ,दप्तर मुक्त शाळा,आनंद बाजार,तल्यावरची शाळा,स्मशानातील शाळा,पोपटी संमेलन,पक्षी निरीक्षण,,ग्रामपंचायत भेट ,अश्या एकापेक्षा एक आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादाला सतत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या अनेक महिने कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत.शाळा केव्हा उघडतील हे निश्चित पणे सांगता येत नाही.त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण देताना ही शिक्षक व विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.कितीही अडचणी आल्या तरी मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रायगड जिल्हा परिषद शाळा सारडे येथे उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर यांच्या संकल्पनेतून माझे अंगण माझी शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 1ली ते 7 वी पाठ्य पुस्तकातील मुलांना समजणारे अनेक छोटे छोटे महत्वाचे घटक व संकल्पनाची माहितीच्या अनेक प्रिंट उपलब्ध करून प्रत्येक प्रिंटला पाठीमागे कडक पुठ्ठा लावला .या सर्व प्रिंट 20 गटात विभागणी करून विद्यार्थ्यांना वाटप केल्या. या प्रिंट मध्ये मराठी ,गणित,इंग्रजी, भूगोल, सामान्य ज्ञान विषयातील पायाभूत संकल्पना मुलांसमोर मांडण्यात आला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली सूंदर अशी रचना करून आपल्या अंगणात मांडणी करून घेतली . आपली रचना कशी सुंदर व आकर्षक दिसेल या दृष्टीने प्रत्येकाने मेहनत घेतली. त्यामुळे आपोआप मुलांमध्ये स्पर्धा निर्माण झालीच पण मुलांचा आपल्याच अंगनात खेळता खेळता अभ्यास ही पूर्ण झाला.आकर्षक मांडणी व चांगला अभ्यास करणाऱ्या गटाला प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थी स्वतः सहभागी असल्यामुळे विविध संकल्पना हातालण्याची सवय लागते.विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो,
प्रत्यक्ष कृती चा अनुभव मिळतो.स्वतःच्या अंगणात शिकायला मिळाल्यामुळे कोरोना महामारी पासून दूर राहता आले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेछटा मुख्याध्यापिका ऊर्मिला म्हात्रे,तंत्र स्नेही शिक्षक सुनील नऱ्हे, सहशिक्षिका समृद्धी वऱ्हाडी.विद्यार्थी पालक व्यस्थापण समिती यांनी मेहनत घेतली