डॉ. संतोष सिंग यांची डिस्ट्रिक्ट चेअरमन पदी नियुक्ती
पनवेल दि.29 (वार्ताहर): डॉ. संतोष सिंग या पनवेलमधील चार इनरव्हील क्लब मधील पहिल्या महिला आहेत ज्यांची डिस्ट्रिक्ट चेअरमन पदी नियुक्ती झाली आहे. हा क्षण इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेल चा एक मोठा अभिमानाचा व आनंदाचा आहे . 37 वी डिस्ट्रिक्ट असेंबली ‘ संजोग ‘ या कार्यक्रमात , 01 जुलै 2020 रोजी , संतोष सिंग यांना डिस्ट्रिक्ट चेअरमन पदी नियुक्ती केले. असोसिएशनचे अध्यक्ष सरोज कटियार, जिल्हा 313 मधील मान्यवर अनुप्रिया पटेल, संसद सदस्य, मिर्जापूर, उत्तर प्रदेश आणि माजी राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि 500 हून अधिक इनरव्हील सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. संतोष सिंग या इनरव्हिल डिस्ट्रिक्ट ३१३ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून रायगड, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर आणि सातारा या परिसरातील 75 क्लबचे नेतृत्व करतील . संतोषसिंग , रुग्णालय प्रशासनात मास्टर्स आहेत. त्या पॅनेसिया हॉस्पिटल, न्यू पनवेल च्या संचालिका आणि इंडो – हेल्थ फाऊंडेशनच्या विश्वस्त आहेत. रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल त्या पहिल्या महिला सदस्य आणि पोल हॅरिस फेलो होत्या. जगातील सर्वात मोठ्या महिला संघटनेचा भाग म्हणून , मैत्री आणि सेवेवर लक्ष केंद्रित करून, संतोषने आपल्या स्वीकृत भाषणात असे म्हंटले की त्या येत्या वर्षी अनेक सेवा प्रकल्प करणार आहेत . त्या , आरोग्य , शिक्षण आणि महिलांच्या रोजीरोटीच्या संधींवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.