नाल्याच्या संरक्षण भितींचे काम निकृष्ठ दर्जाचे; नागरिकांनी केला संताप व्यक्त
पनवेल दि.02 (वार्ताहर): गेली अनेक वर्षापा पडून असलेला कळंबोली सेक्टर ८ कारमेल शाळेला लागून असलेल्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असून संरक्षण भिंत पावसाळ्यात तग धरेल का? असा सवाल नागरिक करत आहेत. तेव्हा या नाल्याची गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातं अशी अवस्था अधिका-यानी सिडको प्राधिकरणाची केली आहे. वरपासून खालपर्यंत कमिशनच्या मागे लागल्याने दर्जेदार कामे कुठे होणार आहेत. गेल्या वर्षीपासून 10 कोटीच्यावर कळंबोली शहरात कामे करण्यात आली या करण्यात आलेल्या कामात कोणतेही निकष लावले गेले नसल्याने सर्व कामे निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत. गेली अनेक वर्षापासून सेक्टर ८ कारमेल शाळेला लागून असलेल्या नाल्याला संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात नाल्याचे पुर्ण पाणी रस्तावर व सोसायटींध्ये शिरत आहे. त्याच नाल्याच्या पाण्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक हैराण आहेत. या बाबत अनेक तक्रारी करूनही संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नाही असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान या नाल्याला संरक्षण भिंत बांधण्याची काम दोन दिवसांपासून सुरू आहे पण या बांधकामासाठी वापरलेला माल हा निकृष्ठ दर्जाचा असून वाळूच्या जागेवर रस्त्यावरील माती वापरल्याचे या कामाची तपासणी केल्याचे दिसून येते तेव्हा हे काम तात्रिंक मान्यतेनुसार झाली नसून संरक्षण भिंत पावसाळा तरी काढेल का? असा सवाल नागरिकांनी करून याची संरक्षण भितींची गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कोट:
या कामाचा दर्जा तपासणे आमच्या इंजिनियरचे काम आहे तेव्हा तसे त्याला सांगतो.
बनकर
कार्यकारी अभियंता कळंबोली, कामोठे