शिवसेना द्रोणागिरी शहर सचिव पदी धनंजय शिंदे तर उपशहर प्रमुख पदी प्रतीक पाटील.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख मा. श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेनेचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते धनंजय शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या द्रोणागिरी शहर सचिव पदी तर प्रतीक पाटील यांची द्रोणागिरी उप शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष मनोहरशेठ भोईर यांच्या कार्यालयात देण्यात आले. यावेळी द्रोणागिरी शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपण शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाना अनुसरून वाटचाल करणार असून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी नेहमी प्रयत्नशील राहू असे मत धनंजय शिंदे, प्रतीक पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. शिवसेना पक्षाच्या द्रोणागिरी शहर सचिव पदी नियुक्ती केल्याबद्दल धनंजय शिंदे तर उप शहर प्रमुख पदी निवड झाल्याने प्रतीक पाटील यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले.