जावळे गाव परिसरात आढळला मृतदेह
पनवेल दि.5 (वार्ताहर)- पनवेल तालुक्यातील से.-25 ए उलवे नोड, जावळे गाव परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे, उंची मध्यम, बांधा मध्यम, अंगात भारतीय क्रिकेट संघासारखा हाफ बाह्यांचा टिशर्ट व हाफ काळी पॅंट घातली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-02227452333 किंवा पो.हवा. सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधावा.