आय लव्ह करंजाडे सेल्फी पॉईंटचे उद्घाटन….सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पुढाकार
पनवेल,(प्रतिनिधी) — करंजाडे वसाहतीच्या प्रवेशद्वाराची शोभा वाढवण्यासाठी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमिताने ‘आय लव्ह करंजाडे ‘ हा सेल्फी पॉईंट उभा केला. या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन सोमवारी ता. 19 रोजी सायंकाळी करण्यात आले. या सेल्फी पॉईंटचे वसाहतीमध्ये प्रचंड कौतूक करण्यात आले. यावेळी या मुख्य चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामांतर देखील करण्यात आले.
करंजाडे वसाहतीची स्वच्छता ठेवताना चौक सुशोभिकरणावरही लक्ष केंद्रित केले. यातूनच करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमिताने करंजाडे वसाहतीच्या मुख्य प्रवेश प्रवेशद्वार आय लव्ह करंजाडे असा सेल्फी पॉईंट उभारावे अशी संकल्पना ग्रामपंचायत कर्मचारी विनायक पोपट यांनी आंग्रे यांच्याकडे मांडली, त्यानुसार याचे कलाकार गिरीश जगे यांच्याबरोबर आंग्रे यांनी याबाबत चर्चा आणि अगदी तीन दिवसामध्ये जगे यांनी वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘आय लव्ह करंजाडे हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला. या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसाच्यानिमिताने त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनांनंतर हा सेल्फी पॉईंट सोशल मिडीयावर तो एवढा गाजला की बहुतांशी करंजाडेकरांच्या स्टेटस, फेसबुक वॉलवर हा सेल्फि पॉईंट झळकू लागला. त्याचबरोबर या सेल्फी पॉईंट च्या मागे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्याची प्रतिकृती उभारण्याची सूचना करंजाडे शिवसेना शहरप्रमुख गौरव गायकवाड यांनी मांडली होती. त्यानुसार हि प्रतिकृती देखील उभारली आहे. तसेच या मुख्य चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामांतर यावेळी करण्यात आले.
आय लव्ह पनवेल या घोषवाक्याचे आज अनावरण करून करंजाडेकरांना अभिमान वाटावा अशा जागेची वसाहतीमध्ये भर पडली आहे. त्या अनुषंगाने अशा जागा वाढत राहाव्यात आणि खरोखर बाहेरून येणार्यांनी करंजाडेच्या प्रेमात पडावे,
– रामेश्वर आंग्रे – सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत