पाले गावातील तरुण रुपेश म्हात्रे या दिव्यांग बांधवाचा प्रामाणिकपणा.
उरण दि 24 रुपेश म्हात्रे हा उरण तालुक्यातील पाले या खेडे गावातला तरुण.रुपेश हा आपल्या उदरनिर्वाहा पोटी भेंडखळ येथिल ULA या कंपनी बाहेर एक टपरी टाकून आपला छोटेखानी व्यवसाय करीत आहे.स्वतःच्या दिव्यांगावर मात करुण रुपेश आपल्या पत्नी आणि छोट्या लहान बाळाचा उदरनिर्वाह मोठ्या ध्येयाने करीत आहे.नेहमी प्रमाणे रुपेश आपली टपरी बंद करुन पाले गावात आपल्या घरच्या दिशेने प्रवास करीत होता.प्रवास करते दरम्यान त्याला पाणदिवे -पिरकोन या मार्गावर एक पर्स सापडली.खरतर अंगी प्रामाणिक पण असल्याने तो पाकीट उघडून पाहाण्याची भिती नसल्याचे कारणच नाही.त्यामुळे रुपेश ने तो पाकीटाची पाहणी केली तर त्यात त्याला 7/8 हजार रुपये रोक कँश,ए टी एम,पँन कार्ड,आधार कार्ड व ईतर छोटे दस्तऐवज होते ते पाहील्यावर समजले की सदर पर्स ही आवरे गावातील तरुण विशाल विष्णू गावंड याची असल्याचे समजताच रुपेश ने सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल करुन तो मेसेज विशाल गावंड पर्यंत पोहचण्याचे आवाहन केले.आणि ती पर्स विशाल गावंड च्या हातात जशीच्या तशी पोहच केली.आणि रुपेश म्हात्रे या दिव्यांग बांधवाची प्रामाणिकणाचा स्वभाव सर्व जनतेला भावला आणि रुपेशवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.त्यामुळे रुपेश सारख्या दिव्यांग बांधवाने आपली प्रामाणिकपणा सिद्ध केल्याने या जगात माणूसकी जिवंत असल्याचा बोध मिळतो.
रुपेश म्हात्रेची प्रतिक्रिया –
खरचं मित्रांनो ती पर्स ठेऊन जे काय त्याच्यात पैसे होते त्या पैशाने जास्तीत जास्त एक मिहीना मौज मजा केली असती परंतू मी माझ्या मनात कोणताही स्वार्थ न ठेवता मी ती पर्स सदर तरुणाच्या स्वाधिन केली आणि त्यानंतर सोशल मिडीया द्वारे आणि प्रत्यक्षपणे जो मला अभिनंदानाचा वर्षाव होत आहे त्या अभिनंदनाने माझे मनोबळ उंचावले आणि मला एक नवी स्फुर्ती निर्माण झाली ते मला त्या पैशाने नक्कीच मिळाले नसते हे नक्की मी मानतो.
विशाल गावंड यांची प्रतिक्रिया :-
मी रुपेश म्हात्रे यांचे आभार मानतो. मी हरविलेले पैसे, पाकीट भेटेल की नाही या काळजीत होतो. पण रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून मला माझे पैसे पाकीट, ATM मला परत मिळाले. आजही समाजात माणुसकी जिवंत आहे.हे रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून मी अनुभवलो.