श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात.
उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )महाड येथील पूरग्रस्त नागरिकांची समस्या, व्यथा लक्षात घेता. महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीकोणातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे महाड येथील कोंडीवते ग्रामपंचायत तसेच नागलवाडी फाटा येथे घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पूरग्रस्त नागरिकांच्या घरांना भेटी देत, त्यांच्या दुःख वेदना समजावून घेऊन पूरग्रस्त नागरिकांना सामान वस्तू वाटप करण्यात आले.संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सदर परिस्थिती बघून अश्रू अनावर झाले.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष -विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष -हेमंत पवार, खजिनदार -सुरज पवार,संपर्क प्रमुख -ओमकार म्हात्रे,आकाश पवार,नितेश पवार, सुविध म्हात्रे, साहिल म्हात्रे, हेमंत ठाकूर, इंद्रजित पवार, अभिजित भोईर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.प्रत्येक पूरग्रस्त व्यक्तींना सामानाचे प्रत्येकी एक किट देण्यात आले. एका किट मध्ये गहू, तांदूळ, इतर अन्नधान्य.कपड्याचे साबण,अंघोळीचे साबण,टूथ ब्रश, टूथ पेस्ट,पाणी बॉटल,चादर,बेडशीट,सतरंजी,कपडे,टॉवेल,बिस्कीट,फरसाण, साखर, चहा पत्ती यासह इतर जीवनाश्यक वस्तूंचा समावेश होता.
कोंडीवते ग्रामपंचायतचे सरपंच सुनील डाऊर,उपसरपंच -राजाराम शिंदे,पोलीस पाटील -धोंडीराम दिघे,माजी सरपंच -पांडुरंग पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष -रघुनाथ सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हातात 40 किट देण्यात आले तसेच इतर 50 किट वेगवेगळ्या भागात घरोघरी जाऊन वाटण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले.उरण मधील नागरिकांनी स्व इच्छेने अनेक सामान वस्तू दिले त्यामुळेच हे वस्तू सामान पूरग्रस्त व्यक्तींना देता आले. गोर गरिबांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने नेहमीच मदतीचा हात दिला आहे.असे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी मत व्यक्त केले.या कामासाठी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी यावेळी आभार मानले.