महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना व युवासेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल, दि.27 (वार्ताहर)- महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुख एक अत्यंत मनमिळाऊ आणि जनतेच्या काळजीसाठी झटणाऱ्या आदर्श नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन एक हात मदतीचा म्हणून शिवसेना व युवासेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आज करण्यात आले.
कोकणात व महाड येथे अतिवृष्टीमुळे लोकांना भयंकर अशा संकटाचा सामना करावा लागत आहे एकतर कोरोना अन् लॉकडाऊनमुळे लोकं आर्थिक अडचणीत सापडले असताना त्यात या अतिमुसळधार, ढगफुटी सदृश्य पावसाने जीवनमान विस्कळीत झाले आहे व लोकांच्या घरात अन्नधान्याची प्रचंड नासाडी झाली अशा संकटात सापडलेल्या नागरिकांना पूरातुन मदतीची गरज भासणार आहे. यामुळे शिवसेना व युवासेना पनवेल वतीने तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील उपजिल्हा संघटक परेश पाटील युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत खारघर शहर अधिकारी विनोद पाटील यांच्या मार्फत अन्नधान्याचा एक टेम्पो भरून जीवनऊपयोगी अन्नधान्य, तांदुळ, डाळ, तेल, दुध, पिण्याचे पाणी, बिस्कीट, फरसाण पाकीटे, मसाले, साबण, कोलगेट, ब्रश आदी सामान आपलं नैतिक कर्तव्य समज़ुन मदत स्वरुपात महाड कोकण येथे घेऊन जात आहोत. या कार्यास मदत करणाऱ्या शिवसेना शाखा जसखार वतीने परेश ठाकुर राकेश ठाकुर सचिन ठाकुर संदीप ठाकुर तसेच शिवसैनिक महेंद्र गायकर , अनंताशेठ पाटील, सुधीर पाटील, विष्णु लहाणे, संतोष पाटील, बी आर पाटील युवासेना उपतालुका अधिकारी अनिकेत पाटील, सुधीर शिंदे या सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले.