सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल रायगड, यांचा मार्फत पूरग्रस्तांसाठी मदत
पनवेल/प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल रायगड, यांचा मार्फत जवळपास चार टन साहित्य श्री सौरभ वारांगे आणि शलाका वारींगे ( माजी उपाध्यक्ष सौ शिल्पा गावडे आणि माजी कोषाध्यक्ष श्री सदशिव गावडे यांची कन्या) यांच्या कडे महाडला पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी पोच केले तसेच सात टन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कलंबस्ते आणि दळवटणे,गावात तसेच गणेश नगर, रामवाडी आणि इतर वाड्यानवर श्री उदय शेट्ये हे चिपळूण मधील कामगार सेनेच्या पदाधिकारी, त्यांनी रस्ते खराब असल्याने मोठी गाडी जाऊ शकत नव्हती म्हणून चार टेम्पो मार्फत आपल्या कार्यकर्ता सह चिपळूण मधील या गावात वाड्या वाड्यात प्रत्यक्ष जाऊन पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पोच केले, सादर कार्यात अध्यक्ष श्री केशव राणे, उपाध्यक्ष,संतोष चव्हाण, प्रीता भोजने,प्रिया खोबरकर,सचिव श्री बाप्पा मोचेमडकर,सह सचिव श्री वासुदेव सावंत,श्री प्रदीप रावले,श्री दीपक तावडे खजिनदार :श्री अनिल नेमळेकर,बाबाजी नेरूरकर संपर्क प्रमुख अपूर्वा प्रभू,सदस्य नंदकुमार वाघाटे,कार्यकर्ते अभय प्रभू,संजय गोवेकर वायगंकर,दत्ताराम सुतार,सौ अर्चना तावडे,सौ आरती सावंत, सौ सुतार,सौ रश्मी वाघाटे सौ कल्पना राणे, ज्ञानेश्वर आंगणे, रंगनाथ नेरूरकर,संतोष नेरूरकर,सचिन नेरूरकर यश मोचेमाडकार, देवेश सावंत,अनिकेत पालव,अभिषेक पालव,प्रतीक भोजणे,संकेत पवार, कार्यकारणी,कार्यकर्ते असे सहभागी झाले होते,अनेक दानशूर व्यक्तींनी जीवनावश्यक वस्तू,पाणी,आर्थिक, इतर साहित्य देऊन मदत केली,ह्या व्यक्तींनी केलेल्या सहकार्यामुळे सादर कार्य करण्यास अतिशय मोलाची मदत झाली आहे,सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ आपले समाजपयोगी कार्य असेच करत राहील असे मंडळाचे अध्यक्ष श्री केशव राणे यांनी सर्वांचे आभार मानले.🙏🙏🙏🙏