आबांच्या आकस्मिक जाण्याने रायगड जिल्हा काँग्रेसची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.- महेंद्र घरत.
उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )
महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव जगताप साहेब (आबा) यांचे 26 जुलै 2021 रोजी आकस्मित निधन झाले.त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.आज उरण तालुका, उरण शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल व सर्व सेल यांच्या विद्यमाने उरण काँग्रेस भवन येथे श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी काँग्रेस नेते तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनीही यावेळी श्रद्धांजली वाहिली.त्यांनी आबांना श्रद्धांजली वाहताना सांगितले कि सदैव हसत मुख असणारा चेहरा आपल्यात नाही यावर आज हि विश्वास बसत नाही. रायगड जिल्हा काँग्रेस ला खऱ्या अर्थाने उभारी देण्यात आबांचा खुप मोठा वाटा आहे. आबा नेहमी कार्यकर्त्यांशी आपुलकीने वागले, प्रशासनावर आबांची चांगली पकड होती. आबांच वक्तृत्व खुपच ऐकण्या सारखं होत.त्यांची वाणी खुप सुंदर होती .त्यांच व्यक्तीमत्व सर्वांना आवडणार होत. त्यांच्या जाण्याने रायगड जिल्हा काँग्रेसची कधीही न भरून येणारी खुप मोठी हानी झाली आहे.तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेल्या या नेत्याला माझ्या कडून माझ्या परिवाराकडून, काँग्रेस पक्षाकडून व इंटक परिवाराकडून मी भावपुर्ण श्रद्धांजली वाहत आहे.
या वेळी रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष -मिलिंद पाडगावकर,जिल्हा परिषद सद्स्य-बाजीराव परदेशी, उरण तालुका महिला अध्यक्षा- रेखा घरत, उरण शहर अध्यक्ष- किरिट पाटील, अखलाक शिलोत्री,सरचिटणीस, महेंद्र ठाकूर, निलेश मर्चंडे, जणुशेठ भोईर, आदिनी आपले मनोगत व्यक्त करून आबांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उरण तालुका काँग्रेस चे अध्यक्ष जे डी जोशी, सेवादल अध्यक्ष- कमलाकर घरत, उरण तालुका इंटक अध्यक्ष-संजय ठाकूर, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष संध्या ठाकूर, जयवंती गोंधळी, सदानंद पाटील, अविनाश पाटील, घनश्याम पाटील,जयवंत पाटील, प्रकाश पाटील, भालचंद्र घरत,विनोद पाटील, उमेश ठाकूर,उरण विधानसभा युवक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर सरचिटणीस विवेक म्हात्रे, आदित्य घरत, प्रेमनाथ ठाकूर, अंगत ठाकूर, अजित ठाकूर, अमोल ठाकूर आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.