राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीद्वारे संपन्न
पनवेल दि.05 (वार्ताहर)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी यांचा वाढदिवस कामोठे येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून तसेच गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकीद्वारे संपन्न झाला.
रायगडच्या पालकमंत्री ना.कु. आदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प. दामाजी गणपत गोवारी विद्यालय, कामोठा से.-8 येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबई शहर निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस व पनवेल शहर निरीक्षक भावना घाणेकर, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सतिश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, नगरसेवक विजय खानावकर, जिल्हा उपाध्यक्ष आजिनाथ सावंत, बबन पवार, ओबीसी जिल्हाध्यक्ष राजूभाई मुलानी, जिल्हा युवाध्यक्ष प्रमोद बागल, विधीसेल जिल्हाध्यक्ष पवनकुमार गायकवाड, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष तुषार सावंत, महिला सरचिटणीस जयश्री देसाई, युवा कार्याध्यक्ष शहाबाज पटेल, उपाध्यक्ष कासमभाई मुलानी, सेवादल अध्यक्ष उद्धव पवार, कामोठे शहराध्यक्ष चंद्रकांत नवले, डॉक्टरसेल अध्यक्ष अमोल कांबळी, शहर कार्याध्यक्ष अमोल बोडके, उपाध्यक्ष अनंत वारे, दत्तात्रय सावंत, स्वप्निल कातकर, हेमंत पवार, नितीन जाधव, राहूल यमगर्णी, प्रकाश आंगणे, संदेश कोठेकर, शैलेश लोंढे, अंकुश ढवळे, नागेश पवार, महेंद्र पाटील, किशोर मुंढे, राहूल यादव आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी त्याठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सूरदास गोवारी यांची मुलगी डॉक्टर परिक्षा यशस्वी झाल्याबद्दल तिचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. फोटोः राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मान्यवर