पोलीस लाईन बॉईज संघटना उरण तर्फे पूरग्रस्तांना मदत.
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )पोलिसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पोलीस लाईन बॉईज संघटनां उरण तर्फे महाड येथील मोहप्रे गावातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मदत करण्यात आले.यावेळी पोलीस लाईन बॉईज संघटना अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष स्नेहा गोडे,सचिव-पप्पू सूर्यराव,सदस्य सचिन गोडे,जयेश मोकल,रवि मोकल,स्वप्नील कुंभार,दिपक सांगळे, प्रशांत भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस कुटुंबातील पोलीस परिवारातील या नवयुकांमार्फत सदर वस्तू वाटप करण्यात आले.या जीवनावश्यक वस्तू मुळे पूरग्रस्तांना एक आधार मिळाला आहे.

