डीएफपीसीएल च्या वतीने महासाथीचा मुकाबला करण्यासाठी साह्य सुरूच पनवेल महानगर पालिकेला रुग्णवाहिका तर झोपडपट्टी भागांत धान्य पाकिटांचे वितरण
पनवेल, ता.10( प्रतिनिधी ) राज्यातील कोरोना संसर्ग स्थिती नियंत्रणात आली असली तरी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेत आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या असून, शासनाच्या या तयारीत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या दीपक फर्टीलायजर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) या भारतामधील एक भरवशाचा रसायने आणि खत निर्मातादार कंपनीकडून देखील मदत केली जात आहे.कोविड-19 सोबत सुरु असलेल्या लढ्यात डीएफपीसीएल’च्या वतीने सातत्याने योगदान देण्यात येते आहे. ही कंपनी महासाथी सोबतच्या भयंकर परिणामांचे उच्चाटन करण्याकरिता आपली सीएसआर कामकाज एजन्सी – ईशान्य फाउंडेशन मार्फत सरकार आणि अन्य संबंधित एजन्सी समवेत खांद्याला खांदा लावून अविरत काम करते आहे.संस्थेच्या उपक्रमाचा भाग म्हणून संस्थे तर्फे आपतकालीन वैद्यकीय साहित्याने सुसज्ज अशी रुग्णवाहिका पनवेल पालिकेला 4 ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देण्यात आली तर तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कारखाना परिसरातील वालिवली, चिंदरन, तोंडारे, वलप, डोंगऱ्याचा पाडा, देवीचा पाडा, पाले, कंपोली आणि पडघे अशा ९ गावांमधील २८०० कुटुंबांना हँड सॅनिटायजर आणि मास्कचे वाटप करून त्यांच्या सुरक्षेची खातरजमा करण्यात आली.पालिकेला रुग्णवाहिका सुपूर्त करते प्रसंगी विधान परिषदेचे सदस्य बाळाराम पाटील, पनवेल महानगर पालिकेतील विरोधी नेता प्रीतम म्हात्रे, नगरसेवक अरविंद म्हात्रे,पालिकेचे वैद्यकीय अधिकारी, पीएमसी डॉ. अनंत गोसावी, पीएमसीचे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या उपस्थितीत होते