कमल हुंदाई वर्क शॉप मध्ये मनसे कामगार सेनेच्या युनिटची स्थापना.
उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कामगार क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कार्यरत असून दिवसेंदिवस कामगार क्षेत्रात मनसेच्या कामगार सेनेला वाढता पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे डॉ मनोज चव्हाण -अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, संतोष धुरी -कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य,संदीप ठाकूर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रोजगार विभाग,राजेश उज्जैनकर -उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,प्रवीण दळवी -महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,विजय पडवळ -चिटणीस महाराष्ट्र राज्य, दत्तात्रेय बेळणेकर -सरचिटणीस महाराष्ट्र राज्य,प्रवीण पवार -सहचिटणीस महाराष्ट्र राज्य,रामदास पाटील -विभाग अध्यक्ष नावडे तळोजा MIDC, कैलास माळी -उपाध्यक्ष पनवेल तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा एम आय डी सी विभागात कमल हुंदाई वर्क शॉप येथे मनसेच्या कामगार सेने अंतर्गत कमल हुंदाई कर्मचारी संघटना स्थापन करण्यात आली.या संघटनेच्या फलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले.ही संघटना स्थापन करण्यासाठी प्रवीण पवार व रामदास पाटील या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
विकास आंब्रे (अध्यक्ष ), रविंद्र शिंदे (उपाध्यक्ष ),सचिन गवळी (कार्याध्यक्ष ),संदीप ठाकूर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रोजगार विभाग,अमोल भवर (जनरल सेक्रेटरी ),निखिल घाग (खजिनदार ), प्रदीप धुरी (सहसेक्रेटरी ), संजय राय (सहसेक्रेटरी )तरबेज खान (सहसेक्रेटरी ),रमण राऊत (सहसेक्रेटरी )आदी कमल हुंदाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. रामदास पाटील,प्रवीण पवार हे पदाधिकारी मनसे पक्षाचा विस्तार कसा होईल, जास्तीत जास्त कंपनीमध्ये मनसेची कामगार संघटना कशी स्थापन करता येईल याचा रात्रंदिवस विचार करून मनसेची कामगार सेना वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कामगार वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी, कामगार वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेच्या युनिटची कमल हुंदाई वर्क शॉप मध्ये स्थापना केल्याची माहिती नावडे विभाग अध्यक्ष रामदास पाटील यांनी दिली.