पनवेल आरटीओ मध्ये चेतना दिवस साजरा
पनवेल ता.12(वार्ताहर) ता. 11 ऑगस्ट 1966 रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची त्यांच्या मागण्यासाठी पहिले एक दिवस सामूहिक रजा आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने यशस्वी करून इतिहास रचला होता. या पहिल्या आंदोलनाच्या परत या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहवाना नुसार ता. 11 ऑगस्ट रोजी पनवेल परिवहन विभाग या ठिकाणी चेतना दिन आयोजित करण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे द्वारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तमान मागण्या मागण्यासंदर्भात निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या यावेळी पनवेल प्रादेशिक परिवहन विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष सुरेश भालेराव, वरिष्ठ लिपिक कालिदास झणझणे, राजेंद्र सूर्यवंशी इत्यादी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते