स्वातंत्र्य दिनी टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपण.
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टायगर ग्रुप उरण तालुका तर्फे उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथील नगर परिषद शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्गाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने जनजागृती करत स्वातंत्र्य दिनी आवळा, जांभूळ, बदाम, चिंच, सिताफळ आदी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी टायगर ग्रुप उरण तालुका अध्यक्ष आकाश जोशी, संपर्कप्रमुख हर्षल जाधव, सदस्य -अजिंक्य जाधव, शिवाजी राठोड, संतोष तापसे, सचिन बाबर, दिपक वाघेला, गजानन गांधी, सिद्धार्थ घरत, आनिकेत झिने आदी मान्यवर उपस्थित होते.