उरण विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा स्थापन.
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी व स्थानिक भूमीपुत्र, बेरोजगारांना न्याय मिळवून देणारी प्रभावी व आक्रमक राजकीय पक्ष असल्याने दिवसेंदिवस मनसेला जनतेचा, नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहावयास मिळत आहे.त्या अनुषंगाने नवनवीन मनसेच्या शाखाही स्थापन होत आहेत.दिनांक १५/८/२०२१ रोजी उरण विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवीन ४ शाखेचे उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .उरण विधानसभा मतदार संघातील करंजाडे, काळुंद्रे, भिंगारी, पेठ या ठिकाणी मनसेच्या नवीन शाखेचे उदघाटन रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या गाव तिथे शाखा या आदेशानुसार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.मनसेचा प्रचार व प्रचार रायगड जिल्हा व नवी मुंबई परिसरात जोरात चालू असून पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टीने, पक्षाचा प्रचार प्रसार व्हावा. मनसेच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळावे या दृष्टीकोणातून अनेक ठिकाणी मनसेच्या शाखा स्थापन करून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू असल्याचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत,मनविसे रायगड जिल्हा अध्यक्ष अक्षय काशीद,उपजिल्हा अध्यक्ष दीपक कांबळी,उप तालुका अध्यक्ष दिनेश मांडवकर,उप तालुका अध्यक्ष निर्दोष गोंधळी,विभाग अध्यक्ष विजय पवार,दीपक पाटील,किरण पवार,उप विभाग अध्यक्ष रोशन गायकर,पनवेल उपतालुका अध्यक्ष संदेश भगत,उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.पनवेल तालुका उपाध्यक्ष संदेश भगत यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.