मोठीजुई माध्यमिक शाळेत माजी सैनिकाच्या शुभहस्ते झाला ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न! माजी सैनिक धाया सखाराम कामोठकर यांच्या शुभहस्ते केलं राष्ट्र ध्वजाचं ध्वजारोहण.
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) 15 ऑगस्ट 2021 हा स्वतंत्र भारताचा 75 वा स्वतंत्र दिन सोहळा. खरंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. या दिवसाच्या स्मरणार्थ, दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही सर्वत्र 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . कोरोना विषाणू जरी कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आणि आरोग्याचा विचार करता सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत या वर्षाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला गेला. १५ ऑगस्ट हा भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन उरण तालुक्यातील मोठी जुई येथे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.तेही कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. दरवर्षी मोठीजुई माध्यमिक शाळेत 10 विच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येत असते.या वर्षी मात्र शालेय कमिटीने गावातील माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा नियोजित केले. “आज सलाम , आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला” या उक्तीणे आज मोठीजुई गावच्या माध्यमिक शाळेत मोठीजुई गावातील माजी सैनिक धाया सखाराम कामोठकर या शूर माजी सैनिक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
“जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो,जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असो,मरण आलं तरी दुःख नाही,फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.” भारत मातेच्या 41 वर्षे सेवे नंतर आता जन्म भूमी असलेल्या मोठीजुई गावात उरलेलं आयुष्य गावच्या सेवेसाठी समर्पित करणार अशी भावना माजी सैनिक धाया कामोठकर यांनी व्यक्त केली.