कोटगाव ग्राम सुधारणा मंडळ व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्थेच्या वतीने खा. कपिल पाटील यांना निवेदन.समस्या मार्गी लावण्याची मागणी.
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ) मंगळवार दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजी उरण तालुक्यातील जासई येथील लोकनेते दि.बा.पाटील मंगल कार्यालयात हुतात्मा स्मारक व लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संपन्न झालेल्या भूमिपुत्र मेळाव्यात माजी खाजदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर ह्यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री, पंचायती राज्य मंत्रालय राज्यमंत्री कपिल पाटील, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधान परिषद-प्रविण दरेकर यांना कोटगाव ग्रामसुधारणा मंडळ, उरण व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था, उरण यांच्या तर्फे उरण तालुक्यातील मौजे. काळाधोंडा कोटगाव हद्दीतील नव्याने होऊ घातलेल्या उरण रेल्वे स्टेशनच्या बाबतीत सिडको व रेल्वे प्रशासनाकडून शेतकरी,प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात आले.विविध समस्या यावेळी खासदार कपिल पाटील यांच्यासमोर मांडण्यात आले. या निवेदनाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील यांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात रितसर विषय समजून घेऊन याबाबत वरिष्ठाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री कपिल पाटील यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांना सांगितले.कोटगाव ग्राम सुधारणा मंडळ उरणचे अध्यक्ष निलेश भोईर व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरणचे अध्यक्ष नवनीत भोईर तसेच हेमदास गोवारी, महेश भोईर, सुरज पाटील आदी पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.