नामदेव खाडे, जयदास वर्तक सर्वोत्कृष्ट सुरक्षा रक्षक म्हणून सन्मानित.
उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )उरण सामाजिक संस्थेच्या भगीरथ प्रयत्नानंतर गेल्या वर्षी 01 डिसेंबर 2020 रोजी द्रोणागिरी नोड मधील गेटवे डिस्ट्रीपार्क (GDL ) या CFS मध्ये जॉईन झालेल्या रायगड सुरक्षा मंडळाच्या 26 सुरक्षा रक्षकांपैकी जयदास वर्तक (मु.गोवठणे,ता – उरण) आणि नामदेव खाडे (मु.केगांव, ता – उरण ) या दोन सुरक्षा रक्षकांना 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनी GDL – CFS मध्ये पार पडलेल्या ध्वजारोहनाच्या शानदार कार्यक्रमात GDL प्रशासनातर्फे सर्वोकृष्ट सुरक्षा रक्षक हा किताब देऊन गौरविण्यात आले. यामध्ये एक मेडल, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू यांचा समावेश आहे.जयदास वर्तक आणि नामदेव खाडे यांच्या चांगल्या कार्यामुळे समाजात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.या दोघांचेही उरण सामाजिक संस्थेने, जनतेने, मित्र परिवाराने त्यांच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.