बांधकामांना कोणताही ठराव न करता स्वतःच्या सहीवर घर बांधकामाची परवानगी देवून लाखोंचा गैरव्यवहार करणाऱ्या उसर्ली ग्रुप ग्रामपंचायतीची उच्चस्तरीय चौकशी करुन कार्यवाही करा.राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व सचिव डी.डी.गायकवाड यांची तहसिलदारांकडे मागणी.
पनवेल / प्रतिनिधी : पनवेलमध्ये फसवणूक करून ग्राहकांना लुटणा-या बिल्डरांचे पेव फुटले आहे. उसर्ली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत तत्कालीन सरपंच यांचे असलेले बिल्डरांशी साटेलोटे सामान्य जनतेला मात्र घातक ठरत असून अनधिकृत बांधकाम करून ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायची यामुळे नागरिक मात्र आयुष्यभराची पुंजी घालवून बसत आहेत. दरम्यान या पंचायत हद्दीत अशी बरीच बांधकामे झाली असून सरपंचाचा सहीवर घर बांधकाम परवानगी देऊन त्यावर ना जावक क्रमांक ना ग्रामसेवकाची सही असते. फक्त सरपंचाच्या सहीवर घर बांधण्याची परवानगी देऊन त्याठिकाणी मोठा कॉम्प्लेक्स बांधला जातो तो देखील अनधिकृत. पनवेल तालुका सध्या येऊ घातलेल्या विविध प्रकल्पांमुळे प्रसिद्ध होत असताना त्याच प्रकल्पांमुळे तालुक्यात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. सिडको हद्दीत जमीन शिल्लक राहिली नसल्याने आता आजूबाजूच्या गावात नागरीकरण वाढत चालले आहे. उसर्ली , देवद , शिवकर, नेरे, विचुंबे, आकुर्ली, गावात मोठमोठ़या इमारती उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी जागा घेवून बांधकाम व्यावसायिक नियम धाब्यावर बसवून बांधकाम करीत आहेत. एखाद्या वास्तुविशारदाकडून आराखडा तयार केला जातो आणि गावातील ग्रामसे