चाणजे परिसरातील जमिन दलालांचा सुळसुळाट.फसवणूक करून जमीन बळकविण्याचा प्रकार सुरु.
उरण दि १९(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने सुरु आहे. विविध राष्ट्रीय प्रकल्प येथे कार्यरत आहेत. उरण मध्ये नवनवीन कंपन्या, प्रकल्प येत आहेत त्यामुळे उरण तालुक्यातील जमिनींना आता सोन्याहून जास्त भाव आले आहेत. याचाच फायदा अनेक दलाल घेत असून अनेक शेतकऱ्यांना फसवून जमिनी कमी किंमतीने विकत घेऊन जमिनी बळकविण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दलालांना विकू नये. आपली फसवणूक होऊ शकते. शेतकऱ्यांनी नेहमी सावध राहावे असे आवाहन चाणजे जमीन बचाव संघर्ष समितीचे दिनेश म्हात्रे यांनी आवाहन केले आहे.
उरण तालुक्यातील चाणजे परिसराचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. याचाच फायदा काही शासकीय अधिकारी वर्ग व बिल्डर यांच्या संगनमताने त्यांनी चाणजे परिसरातील जमीन कमीतकमी किंमतीत खरेदी करण्यासाठी येथील स्थानिक दलालांवर जबाबदारी सोपविली आहे. कारण नंतर या जमिनीला ३ ते ५ पट भाव मिळणार आहे. त्यावर या सर्व रॅकेटचा लक्ष आहे.त्यामुळे या परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी दलालांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. या परिसरात प्रति गुंठा ७ ते ८ लाख असताना हे दलाल प्रति गुंठा अवघा ४ लाख रुपये भाव देऊन जमिनी खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कारण नंतर या जमिनीला भाव ३ ते ४ पट जास्त मिळणार आहे. त्यासाठी काही येथील शासकीय अधिकारी व बिल्डर यांच्या संगनमताने येथे स्थानिक दलाल जमिनी खरेदी करण्यासाठी कामाला लागले आहेत. यामध्ये काही राजकीय नेतेमंडळी ही सहभागी असल्याचे समजते. त्यासाठी बोगस नोटिशी पाठविण्या पर्यंत मजल गेली आहे. सिडकोने अशा कोणत्याही नोटीस काढल्या नसल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते. तरी चाणजे परिसरातील सुज्ञ शेतकऱ्यांनी अशा बोगस आमिषाला बळी न पडता आपल्या उपजीविकेचे साधन असलेली आपली माय जमीन अशा बोगस दलालांच्या भूलथापांना बळी न पडता विकू नका. भविष्यात या जमिनीला सोन्याचा भाव मिळणार आहे. तरी आता कवडीमोल भावाने जमीन विकून उध्वस्त होण्यापासून सावधान राहावे असे आवाहन चाणजे जमीन बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश म्हात्रे यांनी केले आहे.