लाॅजिस्टीक पार्कला उरण मधील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध.सिडकोची बोलती बंद..!
उरण दि १९(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात सिडको मार्फत राबविण्यात येत असलेल्या लॉजिस्टिक पार्कच्या जमीन संपादन प्रकियेबाबत उरण मधील शेतकऱ्यांमध्ये खूप मोठी नाराजी पसरली होती .त्या पार्श्वभूमीवर दिनांक १८/०८/२०२१ रोजी लाॅजिस्टीक पार्कच्या भूसंपादनासंदर्भात सिडकोची शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यामधे जणसुनावणीची बैठक धुतुम येथे ग्रामपंचायत कार्यालयात झाली.बैठकीचे आयोजन धुतुम ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रेश्मा ठाकूर व सदस्यांनी केले होते.सिडकोकडून भूसंपादन विभागाचे सतिशकुमार खडके आणि प्रमदा बिडवे मॅडम आणि इतर अधिकरी सरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येनी शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी कोणताही गोंधळ न घालता अत्यंत मुद्देसूद प्रश्न विचारून अक्षरशः सिडकोचे खडके आणि अधिकाऱ्यांना भांडावून सोडले.त्यांची बोलतीच बंद केली.सर्वप्रथम २२:५% पॅकेजला कडाडून विरोध केला आणि जमीनच न देण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सिडकोला दिला.गावठाणाबाहेरील घरांच्या जमिनीला नोटीसच का काढली ?आणि ही विस्तारीत गावठाणक्षेत्रातील सर्व जमीन भूसंपादनातून वगळण्यात यावी. तरच पुढे चर्चा होईल असा ईशारा दिल्यानंतर सतीशकुमार खडकेंनी विस्तारीत गावठाणक्षेत्रातील जमीन वगळण्यात येईल असे आश्वासन दिले.आणि हा विषय आम्ही सिडकोचे M D यांचे निदर्शनास आणून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
ग्रामस्थांकडून १२:५% चे प्रलंबित प्रश्न,गावासाठी सिडकोकडून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा,वाढीव भावाचे पमेंट,रोजगार,नोकरी व प्रकल्पातील ५०% कामे ही पुढऱ्यांना न देता फक्त त्याच मौजेतील बाधित शेतकऱ्यांना संबंधित ग्रामपंचायतीच्या वतीनेच मिळाली पाहिजेत.तसेच CRZ जवळील जमीनी भूसंपादनातून वगळल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते. या अशा अनेक प्रश्नांनी अधिकाऱ्यांना निरूत्तर केले.
नियाज खात्याचे १२:५% चे भूखंड ३० वर्षांपूर्वीच मंजूर झाले परंतु सिडको ते प्लाॅट देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा थेट आरोप हुतात्मा रघुनाथ ठाकूर यांचा मुलगा लक्ष्मण ठाकूर यांनी केला.हुतात्मा रघुनाथ ठाकूर यांचेच भूखंड न देणाऱ्या सिडकोचा जाहिर निषेध करून शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी प्लाॅट न मिळाल्यास सिडको अधिकाऱ्यांना सिडको भवनासमोर आत्मदहनाचा ईशारा दिला आहे.
शेवटपर्यंत शेतकऱ्यांनी लाॅजिस्टीक पार्कला जमीनच न देण्याचा निर्णय सांगून टाकला.शेवटी सतिशकुमार खडकेसाहेबांना रीकाम्या हातानी परत जावे लागले.
या जनसुनावणीस सरपंच रेश्मा शरद ठाकूर, सदस्य शरद ठाकूर,सदस्य सदानंद ठाकूर,सदस्या वैशाली पाटील माजी सरपंच शंकर ठाकूर,डी.आर.ठाकूर,दत्तू भिवा ठाकूर,लक्ष्मण ठाकूर,माजी सरपंच सदानंद ठाकूर,माजी सरपंच धनाजी ठाकूर,संदेश ठाकूर(चिरले),ॲड.चंद्रकांत मढवी(चिरले),विशाल पाटील (जासई),नंदेश ठाकूर,संतोष पाटील,चंदन ठाकूर आणि मोठ्या संख्येनी तरूण ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.प्रास्तविक आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य शरद ठाकूर यांनी केले.