इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेलचा पदग्रहण समारंभ ….सुनिता आठमुठे यांची अध्यक्षपदी निवड
पनवेल । वार्ताहर ….इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेलचा पदग्रहण समारंभ तथास्तू हॉल पनवेल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने व क्लबच्या सेक्रेटरी ममता राजीवन यांच्या प्रार्थनेने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला गतवर्षाचा अहवाल वाचण्यात आला. इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेलने जिल्हांतर्गत वेगवेगळ्या स्पर्धा व प्रकल्प घेतले होते. तसेच 4 अनाथाश्रमांना उल्का धुरींच्याद्वारे मदत केली याची माहिती दिली. ट्रेजरर सुरूची धोंड यांनी गतवर्षाचा जमाखर्चाचा तपशील दिला. आयएसओ सुरेशा परमारने बर्याच क्लबशी संपर्क साधून उत्कृष्ठ काम केले.
अध्यक्षा सुनिता आडमुळे यांनी पूर्ण क्लबचे भाषणाद्वारे आभार मानले तसेच गेल्या वर्षी क्लब मेंबर्सनी केलेल्या उत्कृष्ठ कामाचे कौतुक केले व त्यांना पुढीलप्रमाणे बक्षिसे दिली. अर्चना राव, सुरेखा परमार, अर्चना राजे, डॉ. अंकिता लोखंडे, डॉ. शितल करांडे, डॉ. श्रध्दा ससाणे, अॅड. स्नेहल वाडकर अशी आहेत. तसेच यावर्षी पुढील नवीन मेंबर्सचे आगम झालेे. त्यामध्ये वर्षा मोटे, सीमा दाहेदार, मुक्ता गुप्ते, सिध्दी लोखंडे, सायली दांडेकर, भूमिका परमार, रचना शेट्ये अशी आहेत.
2021-22 ची नवीन कमिटी निवडण्यात आली. त्यामध्ये प्रेसिडेंट सुनिता आडमुठे, सेक्रेटरी ममता राजीवन, व्हा.प्रेसिडेंट साधना धारगळकर, ट्रेजरर लता शहा, आयएसओ सुरेखा परमार, एडिटर कल्पना कोठारी, जॉ.सेके्रटरी डॉ. हेमा परमार, सीसीसीसी अरूणा आचरेकर, सल्लागार कमिटी ः- अॅड. स्नेहल वाडकर, मंजू परमार, कल्पना लोखंडे, ज्योती देशमाने असे असून नवीन कमिटी व नवीन मेंबर्सना पीन देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
अध्यक्षा सुनिता आडमुठे यांनी पुढील वर्षीच्या प्रकल्पाची माहिती दिली आणि नंतर व्हाईस प्रेसिडेंट साधना धारगळकर यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.