गव्हाण चे माजी सरपंच वसंत म्हात्रे यांना मातृशोक.
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )ग्रुप ग्रामपंचायत गव्हाण चे माजी सरपंच वसंत लहू म्हात्रे यांच्या मातोश्री स्व.अनुसया लहू म्हात्रे यांना वयाच्या 82 व्या वर्षी शुक्रवार दि.20/8/2021 रोजी देवाज्ञा झाली.त्यांच्या पश्चात मुले अनंता लहू म्हात्रे, वसंत लहू म्हात्रे, गणेश लहू म्हात्रे, विलास लहू म्हात्रे, सुनील लहू म्हात्रे. मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंतयात्रेला राष्ट्रीय इंटक चे सचिव कामगार नेते महेंद्र शेठ घरत , पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे , जेष्ठ नेते रघुनाथ शेठ घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अरुण कोळी व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.वसंत म्हात्रे यांचे वडील स्व.लहू म्हात्रे हे स्व. जनार्धन भगत व स्व. तुकाराम घरत यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी होते. त्यांनी अनेक सामाजिक कार्य या विभागात केली आहेत. म्हणून गव्हाण पंचक्रोशीत लहू म्हात्रे यांना आदराचे स्थान आहे. त्यांचाच वारसा पुढे त्यांचे पुत्र वसंत लहू म्हात्रे यांनी समर्थपणे पुढे चालु ठेवला आहे.वसंत म्हात्रे हे गव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच होते. आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत.काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांना या विभागात ओळखले जातात.शुक्रवार दि.20/8/2021 रोजी त्यांच्या आईला देवाज्ञा झाली.आम्ही त्यांच्या या दुःखात सहभागी आहोत या शब्दात कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.