शिवसैनिकांकडून तलावाची स्वछता.
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )
शिवसेना शाखा नवघर यांच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर व परिसरातील सर्वाचे श्रध्दास्थांन असणा-या आसरा देवीच्या तलावात वाड-वडीलां पासून श्री गणपती विसर्जन केले जात आहे. त्या तलावाची तसेच तलावाच्या बांधावरील झालेल्या गवताची,तलावात झालेली शेवाळ, तलावात भावीकांनी सोडलेले निर्माल्य बाहेर काढून सदर तलाव गौरी-गणपती विसर्जनासाठी साफसफाई केली.नवघरचे शिवसैनिकांनी यावेळी स्व मेहनतीने तलावची साफसफाई केली.यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय राजाराम भोईर, ग्रामपंचायत सदस्य गणेश रमाकांत वाजेकर,शिवसेना शाखा प्रमुख अविनाश एकनाथ म्हात्रे,माजी उपसरपंच रविंद्र भोईर,विद्यमान उपसरपंच हितेश भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक के डी भोईर, ज्ञानेश्वर तांडेल,माजी शाखाप्रमुख विश्वनाथ भोईर, शिवसैनिक विकास भोईर, उपशाखाप्रमुख विशाल डाके, शिवसैनिक सुनील भोईर, निलेश पाटील, कुमार सौरभ,घरत कुमार, शुभम पाटील व नवघर गावातील सर्व शिवसैनिक व युवा शिवसैनिक हजर होते यावेळी शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः तलावांमध्ये उतरून साफसफाई केली.