केमिस्ट हृदय सम्राट,मा.आ.आप्पासाहेब तथा श्री.जगन्नाथजी शिंदे(अध्यक्ष- MSCDA व AIOCD) यांच्या द्वारे महाड मधील पूरग्रस्त केमिस्ट बांधवांसाठी फ्रीज,कॉम्प्युटर चा संपूर्ण सेट व प्रिंटर मदत म्हणून देण्यात आला.
पनवेल/प्रतिनिधी:रायगड जिल्हा संघटनेचे कार्यतत्पर अध्यक्ष,श्री.लीलाधर पाटील साहेब व सचिव,श्री.प्रवीण भाई नावंधर यांनी महाड मधील पूर ओसरल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी महाड मधील केमिस्ट बांधवां ची भेट घेऊन त्यांना दिलासा देऊन दैनंदिन जीवनातील उपयोगी वस्तूंचे वाटप केले.केमिस्ट बांधवांना ज्या फ्रीज,कॉम्प्युटर, ई.वस्तू देण्यात आल्या त्यासाठी अध्यक्ष,श्री.लीलाधर पाटील साहेब व सचिव,श्री.प्रवीण भाई नावंधर यांनी भरपूर मेहनत घेतली.
मा.ना.कु.आदीतीताई सुनील तटकरे,(राज्यमंत्री- महाराष्ट्र राज्य व पालक मंत्री-रायगड जिल्हा)यांच्या हस्ते ह्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी मा.आदीतीताईंनी उपस्थित केमिस्ट बांधवांचे सांत्वन केले व जिल्हा केमिस्ट संघटनेचे कौतुक केले.मा.आप्पासाहेब यांच्या मदतीने महाड मधील पूरग्रस्त नागरिकांना लाखों रुपयांच्या औषधांची मदत करण्यात आली,याबद्दल मा.आदीतीताईनीं माहिती दिली.
काही कारणास्तव मा.आप्पासाहेब यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.
महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल चे अध्यक्ष, श्री.विजय पाटील साहेब,MSCDA चे सहसचिव श्री.प्रसाद दानवे साहेब,MSCDA चे मुंबई झोनचे सचिव,श्री.सुनिल छाजेड साहेब,श्री.मदन पाटील साहेब तसेच सातारा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष,श्री.सागर पाटील साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांनी केमिस्ट बंधूंना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
श्री.प्रसाद दानवे साहेबांनी, आपल्या MSCDA च्या अमृत डिव्हिजन ह्या जेनेरिक औषधांच्या कंपनी व त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती दिली.
तसेच महाड केमिस्ट बंधूंना ज्या वस्तू मोफत दिल्या आहेत,त्याबद्दल MSCDA ची औषधे विकत घेणे हा उद्देश नसून भविष्यात महाराष्ट्रात,देशात कोणत्याही केमिस्ट बंधुवर अशी परिस्थिती उद्भवली तर त्यांना सुद्धा ह्याप्रकारे मदत उभी करता यावी , या भावनेतून MSCDA च्या जेनेरिक औषधांची दिवसाला कमीत कमी म्हणजे फक्त 60-70 रुपयांची खरेदी-विक्री करावी असे आवाहन केले.
श्री.विजय पाटील साहेब ह्यांनी संघटनेचा ड्रीम प्रोजेक्ट बद्दल,ह्या स्पर्धेच्या युगात केमिस्टला जिवंत ठेवणाऱ्या M+M ह्या केमिस्ट चेन शॉपी बद्दल माहिती दिली.
केमिस्ट ने ह्या स्पर्धेच्या युगात अपग्रेड कसे रहावे याबद्दल मार्गदर्शन केले.
मुंबई झोन चे सचिव श्री.सुनील छाजेड साहेब यांनी केमिस्ट बंधूंना मार्गदर्शन करताना सांगितले की किराणा व्यापारी,स्टेशनरी चे व्यापारी व इतर व्यापारी लोकांच्या अनेक संघटना आहेत.पण अशा कठीण काळात आपल्या सभासदांसाठी एकमेव संघटना धावून आली ती म्हणजे आपली केमिस्ट संघटना,MSCDA व CDARD.!!म्हणून केमिस्ट लोकांनी एकजूट रहावे. संघटना ही महत्त्वाची आहे,तिला सपोर्ट करावा असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष,श्री.लिलाधार पाटील व जिल्हा सचिव,श्री.प्रवीण नावंधर यांनी सुद्धा केमिस्ट बंधूंना मार्गदर्शन केले.रायगड जिल्हा संघटना ही केमिस्ट बंधूंच्या सदैव पाठीशी आहे याची ग्वाही दिली.त्यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.
महाड केमिस्ट बंधूंना ह्या वस्तू मिळण्यात ह्या दोघांचा मोठा वाटा आहे,हे कोणीही नाकारू शकत नाही.
कार्यक्रमाच्या अंती,श्री.प्रवीण नावंधर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
जय हिंद…….जय संघटना