शिव कृपा गौरा मंडळाच्या वतीने रक्तदान.
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )शिव कृपा गौरा मंडळ खोपटे (पाटिलपाडा ) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा प्रारंभ खोपटे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विश्वानाथ पाटील,उपाध्यक्ष कमलाकर म्हात्रे, शिवकृपा गौरा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केला. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, सातपाडाचे सर्व अध्यक्ष उपस्थित होते.विशेष म्हणजे मंडळाचे हे 80 वर्ष आहे व शासनाचे सर्व नियम पळून हे रक्तदान शिबीर पार पाडण्यात आले असून विशेष म्हणजे हे 80 वे वर्ष असून 93 रक्तदात्यांनी रक्तदान केले.