माझ्या सोबत शारिरीक संबंध ठेव नाहीतर तुझ्या मुलाचे काढलेले व्हिडीओ व्हायरल करील अशी धमकी देणार्याविरुद्ध गुन्हा दाखल
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवून नाहीतर तुझ्या मुलीचे काढलेले व्हिडीओ व्हायरल करील अशी धमकी देणार्या एका इसमाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 25 वर्षीय महिला ही व्यवसायाने बार सिंगर आहे. हिला आरोपी शशिकांत खरात (रा.पलावा सिटी, कल्याण) याने करंजाडे सेक्टर 4 येथील एका बिल्डींगमध्ये फिर्यादी व तिच्या मुलीला वारंवार मारहाण करून तिच्या मुलीच्या अंगावरील कपडे काढून त्याचे नग्न व्हिडीओ बनवून तिच्यासोबत अश्लिल चाळे करून सदर महिलेस शारिरीक संबंध ठेव नाही तर तुझ्या मुलीचे काढलेले व्हिडीओ व्हायरल करीन अशी धमकी देणार्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार सदर आरोपीचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.