श्री. बापुसाहेब डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवीन पनवेल ला “राष्ट्रीय एज्युकेशनल एक्सलन्स २०२१ पुरस्कार जाहीर
पनवेल/प्रतिनिधी:(कैलास रक्ताटे )श्री. बापुसाहेब डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवीन पनवेल ला शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एज्युवर्ड्स या संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा “राष्ट्रीय एज्युकेशनल एक्सलन्स २०२१ ” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांनी या पुरस्कारासाठी नामांकन पाठविले होते त्यापैकी श्री. बापुसाहेब डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवीन पनवेल ची “टॉप अँड आउटस्टँडिंग बी.एड डिग्री ऑफ द ईअर २०२१ महाराष्ट्र अवॉर्ड अंडर इंनोव्हटिव्ह टीचिंग अँप्रोच, ओउटस्टँडिंग ऍडमिनिस्ट्रेशन अँड सोशल काँट्रीब्युशन कॅटेगरी ऑफ द इयर २०२१” तसेच “आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन व्हर्चुअल नॉलेज डिलिव्हरी डूरिन्ग पँडेमिक” अशा दोन वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
ह्या पुरस्काराचे वितरण दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी द ताज वेस्ट एन्ड, बेंगलुरु या ठिकाणी घेण्यात येणाऱ्या परिषदेमध्ये केले जाणार आहे. कोरोना काळातही महाविद्यालयाने आपले शैक्षणिक व सामाजिक कार्य ऑनलाईन च्या माध्यमातून अविरतपने सुरु ठेवले होते व ह्या काळातही उत्तम कार्य करण्याचा जो प्रयत्न केला होता हे या सर्वांचे फलित आहे असे मनोगत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले. त्याचप्रमाणे आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री. धनराजजी विसपुते, संचालिका सौ. संगीताजी विसपुते यांची प्रेरणा , विश्वास व खंबीर पाठिंबा यांची जोड मिळाल्याने हे सर्व शक्य झाले असे त्यांनी म्हटले आहे महाविद्यालयाने मिळवलेल्या या यशामुळे महावियालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.