सिडकोचे भूखंड नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या शैक्षणिक संस्थाकरिता निर्धारित किंमतीत उपलब्ध.
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )
द्रोणागिरी शिवसेना शाखेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई मधील शहरासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय, कॉलेज सुरू करण्यासाठी सिडको मंडळातर्फे जाहिरात देऊन नवी मुंबईतील विविध नोडमध्ये संयुक्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालय उपक्रमाकरिता भूखंड भाडे पट्ट्यावर उपलब्ध करून देण्याकरिता मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 सोसायटी नोंदणी अधिनियम,1860 अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या व योजना पुस्तिकेमध्ये नमूद अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या नवी मुंबई प्रकल्पबाधितांच्या शैक्षणिक संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
सदर योजनेची सविस्तर माहिती, पात्रतेचे निकष, अटी,शर्ती इत्यादी जाणून घेण्याकरता योजना पुस्तक 30/9/2021 ते 29/10/2021 सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 10:30 ते 5:30 या वेळेत सामाजिक सेवा विभागाचे कार्यालय, सातवा मजला, टॉवर क्रमांक 7, बेलापूर रेल्वे स्थानक, वाणिज्य संकुल इमारत (सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकाच्या वर) सीबीडी बेलापुर,नवी मुंबई 400614 येथे उपलब्ध आहेत.सदर माहिती सिडकोच्या www.cidco.Maharashtragov.in या संकेत स्थळावरही उपलब्ध असल्याची माहिती द्रोणागिरी शिवसेना शाखेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी दिली. अधिकाधिक स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जगजीवन भोईर यांनी केले आहे. सिडकोचे भूखंड संयुक्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयसाठी नवी मुंबई प्रकल्प बाधितांच्या शैक्षणिक संस्थाकरिता निर्धारित किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. यासाठी जगजीवन भोईर यांनी पाठपुरावा केला होता.