उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी समिधा म्हात्रे यांची बिनविरोध निवड.
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )उरण पंचायत समितीचे विद्यमान सभापती सागर कडू यांनी आपला राजीनामा दिला होता त्यामुळे सभापती पद रिक्त असल्याने 20/9/2021 रोजी या सभापती पदासाठी आवरे गणाच्या समिधा निलेश म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी समिधा निलेश म्हात्रे यांची सभापती पदी निवड झाल्याचे अधिकृतरित्या जाहिर केले.
उरण पंचायत समितीत एकूण 8 सदस्य असून शेकापचे 5, शिवसेनेचे -2, भाजपचे 1 असे एकूण 8 सदस्य आहेत.सुरवातीला नरेश घरत यांनी सभापतीपद भूषविले होते.त्यानंतर ऍड.सागर कडू यांनी हे पद भूषविले.सागर कडू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सभापती पदाची जबाबदारी समिधा निलेश म्हात्रे यांनी स्वीकारली आहे.समिधा निलेश म्हात्रे यांची निवड ही सहा महिन्या करिता असून समिधा म्हात्रे यांचे पती निलेश म्हात्रे हे शेकापचे निष्ठावंत, एकनिष्ठ ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत.समिधा म्हात्रे आवरे येथील रहिवासी असून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या त्या सदस्य आहेत. समिधा निलेश म्हात्रे यांची सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याने शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे. नागरिकांनी,जनतेने शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.