निसर्ग गार्डन हॉटेलवर कारवाई
पनवेल, दि.20 (वार्ताहर)- तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीत असलेल्या निसर्ग गार्डन हॉटेलवर पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर ठिकाणी ग्राहक लोकांची टेबलावर बसून गर्दी करून खाद्यपदार्थ सेवन करताना त्यांना सर्व्हिस देणाऱ्या वेटरने मास्क न लावता व सामाजिक अंतर न पाळल्याचे आढळून आले व कोरोना विषाणू सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्याची जाणीव असताना देखील हयगयीचे व निष्काळजीपणाचे कृत्य केले म्हणून सुखरान गिरी (वय-34) हॉटेल कॅशर व युवराज शेळके (वय-26) मॅनेजर यांच्याविरूद्ध कलम-188, 269, भादंवि साथ रोग प्रतिबंध अधिनियम कलम 2,3 सह महाराष्ट्र शासन कोव्हिड-19 2020चे कलम 11 अन्वये कारवाई कऱण्यात आली आहे.