वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एन.बी.कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून केली कारवाई
पनवेल/प्रतिनिधी:मानवी जिवीतास हानीकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला विमल पानमसाला व तंबाखु ( सुगंधीत ) , एक देशी बनावटीचे पिस्तुल , वाहने , रोख रक्कम असा सुमारे ७ ९ लाख रूपये किमंतीचा मुद्देमालासह पाच आरोपी जेरबंद , गुन्हे शाखा नवी मुंबई यांची कारवाई . मा . अपर पोलीस आयुक्त , यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे प्राप्त गोपनीय अनुषंगाने दिनांक १७ / ० ९ / २०२१ रोजी गुन्हे शाखेचे वपोनि कोल्हटकर यांना मिळालेल्या बातमीवरून , सेक्टर ३० ए , ओरीसा भवन , वाशी नवी मुंबई परिसरात करण व त्याचे साथीदार हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला पानमसाला व तंबाखु ( सुगंधीत ) मालाची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणुन तेथे दुसऱ्या वाहनां मधून वितरीत करणार आहेत . बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांचे सुचने प्रमाणे दिनांक १७ / ० ९ / २०२१ रोजी पहाटेचे सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एन.बी.कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई केली , ओरीसा भवन समोरील निर्जण रोडवर एका आयशर टेम्पो मथुन बोलेरो पिकअप जिपमध्ये काही इसम गोण्यामधे असलेला विमल पानमसाला व वी -१ सुगंधीत तंबाखू भरत असतांना पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेण्यासाठी घेराव घातला असता तेथील इसमांनी पोलीसांशी झटापट केली तसेच एक इसम पळुन जात असतांना शिताफिने त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले . त्यादरम्यान तेथील पोलीसांचे अभिलेखावरील सराईत आरोपी करण राम साळुके याने त्यावेकडील अग्निशस्त्र पोलीसांवर रोखुन धाक दाखवुन जिवेठार मारण्यचा प्रयत्न करत , कायदेशिर कारवाईस अडथळा निर्माण करुन सदर ठिकाणाहुन अंधार व गोंधळाचा फायदा घेवुन पळुन गेला . सदर ठिकाणाहुन कारवाई दरम्यान आयशर टेम्पो , बोलेरो पिकअप जिप , फॉच्युनर कार या वाहनांमध्ये २७ , ९ ३,८८० / – रू . किंमतीचा मानवी जिवीतास हानीकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला वेगवेगळया प्रकाराचा पानमसाला व तंबाखु ( सुगंधीत ) असा मालाचा साठा व त्यासाठी वापरण्यात आलेली वाहने , फॉरच्युनर कारमध्ये मिळुन आलेली रोख रक्कम , एक देशी बनावटीचे पिस्तुल , मोबाईल फोन व इतर सुमारे ७ ९ , ००,८८० / – रू . चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन याबाबत वाशी पोलीस ठाणे गु.र.नं. ३२३/२०२१ भा.द.वि. कलम ३०७ , ३५३ , १८८ , २७२ , २७३ , ३२८ , ३४ सह अन्नसुरक्षा कायदा कलम २६ ( २ ) ( 1 ) , २६ ( २ ) ( iv ) , २७ ( ३ ) ( D ) , २७ ( ३ ) ( E ) भारतीय हत्यार कायदा कलम ३ , २५ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) , ( ३ ) / १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . प्रस्तुत गुन्हयात ०५ आरोपींना दि . १८ / ० ९ / २०२१ रोजी ०१.३४ वा . अटक करण्यात आली असुन दि . २३ / ० ९ / २०२१ रोजी पावेतो पोलीस कस्टडी अटक आरोपींची नावे : 9 . अजयकुमार सुरज गौंड , वय ३३ वर्षे धंदा ड्रायव्हर , रा . फळ मार्केट , सेक्टर १ ९ , वाशी , नवी मुंबई , मुळ राहणार , सलाहाबाद , सरकारी आवास , ता.जि. महु , राज्य उत्तरप्रदेश २ . गोविंद वामन बोडारे , वय ४४ वर्षे , धंदा ड्रायव्हर , मु.पो. ओझर मिग , ता . ओझर , जि . नाशिक ३ . घेवाराम कान्हाराम देवाशी , वय ३१ वर्षे , धंदा किराणादुकान , राह . धनअळी अपार्टमेंट , शॉपनंबर १ , लक्ष किराणा स्टोअर , सेक्टर ३६ , करावेगाव , नवी मुंबई 8 . अक्षय मुरली गायकवाड , वय २१ वर्षे , धंदा हमाली , राह . मानखुर्द , महाराष्ट्र नगर , गणेश मैदानाजवळ , शिवाजीनगर , मुंबई , मु.पो. गवर , ता . बसव कल्याण , जि . बिदर , राज्य कर्नाटक ५ . राहुलकुमार मुन्नाप्रसाद कुमार , वय २६ वर्षे , धंदाहमाली , राह . लंगडपुर , पो . महाराजगंज , ता . जि . गाजीपुर , राज्य उत्तरप्रदेश
पाहिजे आरोपी : -करण राम सालुंके , वय २७ वर्षे रा – प्लॅटनं . ४०४ , मंगल मुर्ती बिल्डींग , जुहुगांव , वाशी , नवी मुंबई . त्याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . १ ) तुर्भे एम.आय.डी.सी. पो.स्टे . गु.र.नं. १२/२०१८ भा.द.वि.क. ३ ९ ४,३४ प्रमाणे २ ) एन.आर.आय. पो.स्टे . गु.र.नं. १६५/२०२१ भादवि कलम १८८,२७२,२७३ , ३२८ सह अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६.२७ या गुन्हयात पाहिजे आरोपी आहे . अटक आरोपी क . ३ घेवाराम कान्हाराम देवाशी याचे विरुध्द एन.आर.आय. पो.स्टे . गु.र.नं. १६५/२०२१ भादविसंक १८८,२७२,२७३ , ३२८ सह अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६,२७ प्रमाणे गुन्हा दाखल असुन या गुन्हयात पाहिजे आरोपी आहे . आरोपीतांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला पानमसाला व तंबाखु ( सुगंधीत ) , अग्निशस्त्र ह बेकायदेशिररित्या कोठुन आणला व तो कोठे विक्री करणार होते . या अवैध व्यवसायामध्ये आंतरराज्य टोळीसकिय असुन त्या अनुषंगाने इतर साथीदारांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत अधिक तपास सुरु आहे . मा . पोलीस आयुक्त , श्री . बिपिनकुमार सिंग , अपर पोलीस आयुक्त , श्री . महेश घुर्ये , नवी मुंबई यांनी सुरू केलेल्या “ नशा मुक्त नवी मुंबई ‘ अभियान अंतर्गत पोलीस उप आयुक्त , श्री . प्रविणकुमार पाटील , सहायक पोलीस आयुक्त , श्री . विनोद चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , नवी मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन . बी . कोल्हटकर , पोउपनि नितीन मुदगुन , धनराज केदार , शेखर तायडे , पोलीस अमंलदार ज्ञानेश्वर सांगळे , उत्तम तरकशे , हनुमंत दळवी , सतीश भोसले , पोपट जगदाळे , महेंद्र म्हात्रे , भास्कर कुंभार , राजेश सोनावणे , संदिप कोळी , विकास म्हसकर , उदय म्हात्रे , आर.कोडी , सुभे , पवार , एस.पी.फुलकर , रविद्र सानप यांनी उल्लेखनीय कामगीरी केली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास व.पो.नि.एन.बी. कोल्हटकर हे करीत आहेत .