जय गोपीनाथ प्रतिष्ठान च्या वतीने कामोठे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
पनवेल/प्रतिनिधी:जय गोपीनाथ प्रतिष्ठान च्या वतीने कामोठे येथील सेक्टर 7 मध्ये रक्तदान शिबिर व कोरोणा योद्धा प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला . जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष आंधळे, उपाध्यक्ष, आनंद ठोंबरे,
सचिव हनुमंत विघ्ने, खजिनदार संग्राम केंद्रे, सह खजिनदार,मंगेश रहाटे ,सहसचिव, ऋषिकेश सांगळे तसेच संस्थेचे-मार्गदर्शक बबन बारगजे भाजपा नेते व अनेक सहकारी यांनी हा कार्यक्रम पार पाडला . या कार्यक्रमासाठी ठाण्यातील वर्हाडी मिसळचे मालक व युवा उद्योजक श्री.गजानन आंधळे व समस्त वंजारी समाज ठाणे शहर त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते,
या कार्यक्रमासाठी विविध स्तरातील व्यक्तींनी उपस्थिती दाखवून सहकार्य केले
सौ.मोनिका प्रकाश महानवर – सभापती-महिला-बालकल्याण समिती पनवेल महानगर पालिका,
. डॉक्टर राजेंद्र खाडे, डॉक्टर मारुती गीते श्री रामदास सांगळे, नारायण गर्जे तसेच कळंबोली चे नगरसेवक राजेंद्र कुमार शर्मा यांनीही या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या . व पुढील वाटचालीस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले . कोरोणा काळामध्ये ज्यांनी जीवाची बाजी लावून काम केले अशा विविध स्तरातील मान्यवरांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.