रक्तदान शिबिर व हॅपी मेडीकेअर जर्मेनियम थेरेपी शिबिराचे आयोजन
पनवेल/प्रतिनिधी :- २५ सप्टेंबर,२०२१ जय हनुमान युवा मित्र मंडळ देवद, पनवेल याच्या वतीने गौरा गणेशोत्सवा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आणि हॅपी मेडीकेअर जर्मेनियम थेरेपीचे मोफत आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदात्यांनी उस्फुर्तपणें रक्तदानामध्ये सहभाग घेतला तसेच सुमारे २५ लाभार्थ्यांनी जर्मेनियम थेरेपीच्या माध्यमातून उपचारांचा लाभ घेतले.
या शिबिरांचे आयोजन श्री स्वामी सिधवासा अपार्टमेंट, देवद, पनवेल येथे जय हनुमान युवा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळेस एम.जी एम. हॉस्पिटलच्या लायन्स क्लबचे पदाधिकारी, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते तसेच हॅपी मेडी केअर जर्मेनियम थेरपी यांच्या वतीने पनवेल केंद्राचे श्री. सागर सर, श्री सुमित गायकर व अर्चना मॅडम हे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. स्वामी सिधवासा अपार्टमेंटचे अध्यक्ष श्री जयंत पाखरे यांच्या हातून उदघाटन करण्यात आले.
जय हनुमान युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.आकाश वाघमारे,
श्री.संदीप वाघमारे,श्री निलेश वाघमारे, श्री. विनोद भगवान वाघमारे, श्री. विजय वाघमारे,श्री. रोहित वाघमारे,श्री. समीर वाघमारे, श्री. समीर म्हात्रे, श्री.राम गायकर,श्री. जितेश खुटले, श्री. सागर पाटील, श्री. अमित म्हात्रे, श्री.प्रदीप पाटील, श्री.हेमंत म्हात्रे,एम. जी.एम.
हॉस्पिटलचे लायन्स क्लबचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. जय हनुमान युवा मित्र मंडळाकडून सर्व रक्त दात्याना प्रमाणपत्र देण्यात आले.