शिवसेना पक्षात पनवेल शहर राष्ट्रवादी उपाध्याक्ष व धनगर समाजाचे नेते तसेच उद्योजक श्री.आबासो रामचंद्र लकडे यांच्यासह शेकडो समर्थकांचा जाहीर पक्षप्रवेश
पनवेल / प्रतिनिधी:मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन, मावळ लोकसभा खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत,तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महानगर प्रमुख श्री.रामदास शेवाळे तसेच पनवेल विधानसभा समन्वयक श्री. प्रदीप ठाकुर यांच्या विशेष प्रयत्नांने ,कलंबोली शहरातील पनवेल शहर राष्ट्रवादी उपाध्याक्ष व धनगर समाजाचे नेते तसेच उद्योजक श्री.आबासो रामचंद्र लकडे यांच्यासह शेकडो समर्थकांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश करून, हाती शिवबंधन बांधून घेतले.
त्याप्रसंगी शिवसेना पनवेल उपजिल्हाप्रमुख श्री.रामदास पाटील,महानगर प्रमुख रामदास शेवाळे,तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत ,शहरप्रमुख डि.एन. मिश्रा, शहर समन्वयक गिरिष धुमाळ, शहर संघटक अक्षय साळुंखे, उपशहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, नारायण फडतरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!