गांधी जयंती निमित्त कुष्टरोग मुक्त भारतची प्रतिज्ञा.
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )
दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी ११ वाजता उरण तालुक्यातील विंधणें ग्रामपंचायतच्या वतीने महिला ग्रामसभा घेण्यात आली.महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्त्मा) रायगड अलिबाग यांचे वतीने १)प्रेरणा स्वयंसहाय्यता बचत गट बोरखार गाव
२) श्री शितलादेवी प्रसन्न स्वयं सहाय्यता गट टाकीगाव यांचे प्रतिनीधी यांना नोंदणी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपस्थित कृषी सहाय्यक आर.पी. भजनावळे, सरपंच निसर्गा रोशन डाकी , उपसरपंच सुनीता पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक रविंद्र गावंड,समुदाय संसाधन प्रतिनिधी कु. रुपाली तुकाराम पाटील, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व स्वयं सहाय्यता बचत गट महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित महिलांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त कुष्टरोग मुक्त भारत करण्याची प्रतिज्ञा घेतली.