बाळासाहेब ठाकरे विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा तालुका विधी सेवा समिती पनवेल आयोजीत प्रभात फेरीत सहभाग खारघर पोलीस स्टेशनलाही भेट.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तालुका विधी सेवा पनवेल यांच्यामार्फत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रभात फेरीत बाळासाहेब ठाकरे विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेवून भारत सरकारच्या जनजागृती कार्यक्रमाला आपला हातभार लावला.त्याच बरोबर खारघर पोलीस स्टेशनला भेट देवून पोलीस स्टेशनची कार्यपद्धती खारघर पोलीस ठाण्याच्या आधिकार्यांकडून जाणून घेतले.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेश साखरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत दिनांक 2 आक्टोंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याच्या निर्देशानुसार नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी शनिवार दिनांक 2 आक्टोंबर रोजी रोजी तालुका विधी सेवा समिती, पनवेल यांचे मार्फत पनवेल शहरात सकाळी 9 वा. प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रभात फेरीत बाळासाहेब ठाकरे विधी विद्यालय तळोजाचे विद्यार्थ्यां प्राचार्य डाॅ.राजेश साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणत उत्सुफूर्तपणे सहभागी होवून भारत सरकारच्या कायदेविषयि जनजागृती कार्यक्रमाला पाठींबा दर्शविला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला सूरु झालेला हा विधी मार्गदर्शन कार्यक्रम पंडीत जवाहरलाल जयंती 14 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.या कार्यक्रमा आंतर्गत पनवेल विधी समिती मार्फत गावोगावी जावून लोकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.कायद्याच महत्व सामान्य जनतेस पटवून देण्यात येणार आहे. सामान्य जनतेला मोफत विधी सेवा कशी पुरवीली जाईल याबद्दल सांगण्यात येणार आहे.
कायदेविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कायदेविषयक जनजागृती करत आजादी का अमृत महोत्सवाची सुरूवात करण्यासाठी काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीमध्ये पनवेल जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश तसेच विधिज्ञ,बाळासाहेब ठाकरे विद्यालय तळोजाचे प्राचार्य व विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला
चौकट:-
खारघर पोलीस स्टेशनला भेट दूवून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलीस कार्यपद्धती….
प्रभात फेरी नंतर विधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खारघर पोलीस स्टेशनला भेट देवून,पालीस स्टेशन मध्ये चालणारी कार्यपद्धती समजून घेतली.त्यामध्ये एफ आर आय,तडीपारी, चाप्टर केस, गुन्ह्याचा तपास,पोलीस कस्टडी अशा अनेक पैलूंची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना ए.पि.आय पाटील यांनी मार्गदर्शन केल